Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:53 IST2025-08-05T15:51:53+5:302025-08-05T15:53:41+5:30

पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह शुक्रवारी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक सापडला होता

Nilesh Ahire body was found in Maldoli creek after five days | Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात

Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात

चिपळूण : वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दाम्पत्यामधील नीलेश ब्रह्मण अहिरे याचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनंतर २० किलाेमीटर अंतरावरील मालदोली खाडीत रविवारी सायंकाळी ७:३० सापडला. त्याची पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह शुक्रवारी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक सापडला होता. त्यानंतर नीलेश अहिरे याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी पुलावरून नीलेश आणि अश्विनी अहिरे या नवदाम्पत्याने नदीत उडी घेतल्याची घटना ३० जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाइक या दोघांचा शोध घेत होते. या शोधमोहिमेत शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी धामणदिवी येथे खाडीकिनारी अश्विनी हिचा मृतदेह सापडला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यानंतर नीलेशचा शाेध सुरूच हाेता. हा शाेध घेत असतानाच रविवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान उडी मारलेल्या ठिकाणापासून सुमारे २० किलाेमीटर अंतरावरील मालदाेली खाडीत त्याचा मृतदेह सापडला. दरम्यान, याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल याद्वारे आता चिपळूण पोलिसांकडून तपास व चौकशी सुरू आहे.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साक्री धुळे येथून अनेक नातेवाईक चिपळुणात दाखल झाले, तेही शोधमोहिमेत सहभागी झाले होते. नीलेशचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरू होती. त्यासाठी नातेवाइकांनीही स्वतंत्र बोटीची व्यवस्था केली होती. अश्विनी व नीलेश यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याविषयी अद्याप उलगडा झालेला नाही.

मित्रमंडळींनाही धक्का

नीलेश अहिरे (मूळगाव साक्री, जि. धुळे) हा शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आला होता. चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर त्याने मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. याच ठिकाणी स्वत:ची मोबाइल शॉपी सुरू केली आणि ताे चिपळुणातच स्थायिक झाला. त्याच्या आत्महत्येमुळे मित्रमंडळींनाही धक्का बसला आहे.

Web Title: Nilesh Ahire body was found in Maldoli creek after five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.