शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा

By admin | Updated: July 3, 2016 23:45 IST

भास्कर जाधव : चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरातून ललकारी

चिपळूण : आपला कोणत्याही वादाशी संबंध नाही. आपले कोणाशीही भांडण नाही. झाले गेले विसरुन आजपासून सर्व मतभेदांना तिलांजली देऊया. चिपळूण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथील नगर परिषद, पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा. आपल्याला आता विरोधकांचे पार्सल उचलायचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करु या व सर्व निवडणुका जिंकूया, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रभारी, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केले. चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे शिबिर शनिवारी माटे सभागृहात झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, प्रदेश विद्यार्थी उपाध्यक्ष विक्रांत जाधव, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, युवक अध्यक्ष राजू आंब्रे, जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुकादम, पद्माकर आरेकर, विष्णुपंत सावर्डेकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहिते, डॉ. सेलचे डॉ. संतोष दाभोळकर, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चिपळूण तालुकाध्यक्ष खताते यांनी प्रास्ताविक केले. आमदार जाधव म्हणाले की, रमेश कदम व माझे काय भांडण आहे? काहीही नाही. पक्षात आल्यानंतर २००६मध्ये आपण स्वत:हून सर्वांनी एकत्र यावे म्हणून मेळावा घेतला. परंतु, त्या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी मेळावा घेतला. त्या मेळाव्यात लोक काय वाटेल ते बोलले. मी उत्तर दिले नाही. त्यामुळे वेळोवेळी मला काढून टाकण्यापर्यंत ठराव करण्यात आले. मी काही बोललो नाही. मला माहीत आहे की माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांचे राजकारण चालत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. (प्रतिनिधी) हा जिल्हाध्यक्षांचा अपमान : श्रीकृष्ण खेडेकर शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांनी भाषणात नगरसेवक इनायत मुकादम यांना येथे येण्यास लाज वाटली पाहिजे. हा जिल्हाध्यक्षांचा अपमान होत असेल तर योग्य नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही, असे मुकादम यांच्याकडे पाहून म्हटले. त्यावेळी वातावरण चांगलेच तापले. इनायत मुकादम, फैय्याज देसाई व अन्य दोन ते तीन कार्यकर्त्यांनी उठून खेडेकर यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. मुकादम व्यासपीठाच्या दिशेने गेले. यावेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी त्यांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर प्रभारी भास्कर जाधव यांनी त्यांना गप्प बसविले. यावेळी गदारोळ होतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, नशिबाने थोडक्यात आटोपले.