शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या दस्तऐवजाने गोठा केला नावावर

By admin | Updated: July 14, 2015 21:46 IST

अंकुश सावंत : पंचायत समितीकडून कार्यवाही होत नसल्याने उपोषणाचा इशारा

गुहागर : तालुक्यातील जामसूद येथील जयवंत सावंत यांनी खोटे दस्तऐवज सादर करुन घर नावावर करणे, जमीन मालकांची परवानगी न घेता ग्रामपंचायतीमध्ये मालमत्तेवर नाव लावून अनधिकृतपणे गोठा बांधून तो नावावर केला आहे. याप्रकरणी संबंधित सर्व स्तरावर तक्रार करुनही पंचायत समितीकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तक्रारदार अंकुश रामचंद्र सावंत यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.जामसूद येथील या घराला २००१-०२ पर्यंत रामचंद्र विठ्ठल सावंत यांचे नाव होते. ते मृत झाल्यानंतर त्यांचे भाऊ वसंत विठ्ठल सावंत यांचे नाव कोणाच्याही परवानगीशिवाय लावण्यात आले. वसंत सावंत मृत झाल्यानंतर २०१२ पासून त्यांचा मुलगा जयवंत सावंत यांचे नाव लागले आहे. याबाबत रामचंद्र सावंत यांचे मुलगे अंकुश, बबन, बळवंत व सुहास यांनी आपली कोणतेही संमती न घेता नावे कशी लागली, याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.यावेळी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीला दिलेल्या संमतीपत्रात खोट्या सह्या करुन परवानगी मिळवल्याचे उघड झाले. यावरुन गुहागर पोलीस ठाण्याकडून संबंधितावर गुहागर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन ग्रामसेवक पोपट गोविंद पोळ यांना सहआरोपी करण्यात आले. हा विषय न्यायप्रविष्ट असला तरी यानंतरच्या काळात जयवंत सावंत यांनी कोणाचीही संमती न घेता गोठ्यांचे बांधकाम केले आहे. याचा वेगळा खातेउतारा ग्रामपंचायतीने दिला. ग्रामपंचायत नोंद नसताना व कोणतीही कागदपत्र नसताना मालमत्ता उताऱ्यावर नावे चढवण्यात आली. हा गोठा अनधिकृत असल्याने याबाबत पूर्ण चौकशी करुन कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार अर्ज दिला होता.हा अर्ज दिल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत तसेच तहसीलदार यांना याबाबत चौकशी करण्याचे पत्र आले. मात्र, पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तीनवेळा पत्रव्यवहार करुनही कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने अखेर अंकुश रामचंद्र सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती व तहसीलदार यांना बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)