शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

ओवळीतील वादळग्रस्तांच्या मदतीला धावले मुंबईकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कातवडी वस्तीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वाऱ्याच्या जोराने घरावरील पत्रे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कातवडी वस्तीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वाऱ्याच्या जोराने घरावरील पत्रे उडून गेले होते. पावसाळा तोंडावर आला तरी परिस्थितीअभावी त्यांना घरावर पत्रे टाकता आले नाहीत. याची दखल घेत मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातील १९८३च्या दहावी बॅचमधील विद्यार्थी कातकरी लोकांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी प्रथम नुकसानग्रस्तांच्या घरांची पाहणी करत आवश्यक असलेले पत्रे, लोखंडी पाईप व आवश्यक ते सर्व साहित्य मोफत दिले आहे.

मुंबई दादर येथील आई. ई. एस. गर्ल्स स्कूल राजा शिवाजी विद्यालयाचे १९८३ बॅचचे विद्यार्थी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संघटित झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरातही या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून लाखोंची मदत केली होती. या माजी विद्यार्थ्यांमध्ये कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच विविध ठिकाणच्या लोकांचा समावेश आहे. तालुक्यातील ओवळी तसेच कोळकेवाडी धनगरवाडी येथे तौक्ते चक्रीवादळात सामान्य व गरजू कुटुंबांना फटका बसल्याची माहिती राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ओवळी येथील नंदा निकम, रामचंद्र निकम, संजय पवार, गीता पवार, शेवंती पवार, विष्णू निकम या कातकरी वाडीतील लोकांच्या नुकसानाची पाहणी केली. ग्रुपचे जितेंद्र खानविलकर, सचिन शिंदे, किरण शिंदे, राजेश चाळके, संजय जगदाळे, विजय शिगवण यांनी कातकरी वस्तीमधील नुकसान झालेल्या घरांची पाहणी करत आवश्यक वस्तूंंची यादी केली. त्यानुसार छत दुरूस्तीसाठी लागणारे, पत्रे, लोखंडी पाईप, खिळे आदी सर्व साहित्य एका ट्रकमध्ये घेऊन ते ओवळीत पोहोच केले.

यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याने कातकरी बांधवांनी समाधानाची भावना व्यक्त केली. या मदतकार्यात ग्रुपचे अध्यक्ष माधवी गवाणकर, मनोज मुळ्ये, डॉ. अश्‍विन सावंत, अमोघ मथुरे यांनी मेहनत घेतली. हे साहित्य देताना ओवळीच्या सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे, सदस्य केशव कदम, निकीता शिंदे, संपदा बोलाडे, माधवी शिंदे, दीपिका शिंदे, ग्रामविकास अधिकारी मंगेश पिंगळे यांच्यासह ग्रुपचे सदस्य व नुकसानग्रस्त कातकरी बांधव उपस्थित होते.