गुण कमी पडल्याने आई ओरडली, मुलाने आयुष्यच संपवले; रत्नागिरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:27 IST2025-08-25T14:25:22+5:302025-08-25T14:27:31+5:30
रत्नागिरी : दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आई ओरडल्याच्या रागातून एका १५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या ...

गुण कमी पडल्याने आई ओरडली, मुलाने आयुष्यच संपवले; रत्नागिरीतील घटना
रत्नागिरी : दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आई ओरडल्याच्या रागातून एका १५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहान असलम कापडे (रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत त्याचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (वय ६५, रा. एमजी रोड, भाजी मार्केट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांची बहीण नसरीन अस्लम कापडे यांचा मुलगा रेहान हा शहरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत होता.
त्याला घटक चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. आई ओरडल्याने त्याने रागाच्या भरात खाेलीतील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.