शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे दौरे, मोर्चामुळे प्रशासनाची तारांबळ

By admin | Updated: October 15, 2016 01:16 IST

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्रिगण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा दौरा

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्रिगण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा दौरा आणि त्याचवेळी मराठा मूक मोर्चा असे महत्त्वाचे उपक्रम सलग दोन दिवसांत होत असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली आहे. उद्या, रविवारी चिपळूण येथे मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या नियोजनाची तयारी जिल्हा प्रशासनाकडून होत असतानाच आज, शनिवारी नाणीज येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे याही असणार आहेत. त्यामुळे चिपळूणबरोबरच नाणीज येथील बंदोबस्ताची तयारी सुरू झाली आहे. या दौऱ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने वाहने तयार ठेवण्याच्या सूचना दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. या दोन उपक्रमांची तयारी सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचाही नाणीज येथे दौरा जाहीर झाला आहे. त्यांना अति विशेष सुरक्षा (झेड प्लस) आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. आज, शनिवार आणि उद्या, रविवार रोजी होणाऱ्या या तीनही महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत शुक्रवारी सायंकाळ उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठका घेताना जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक नाणीज येथेही सुरक्षा व्यवस्था तपासत आहेत. (प्रतिनिधी)