शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

संदेश पारकर सेनेत प्रवेश करणार?

By admin | Updated: October 10, 2015 23:49 IST

तर्कवितर्कांना ऊत : विनायक राऊत यांनी घेतली भेट

कणकवली : काँग्रेसमधील नाराज युवा नेते व कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्या गटाचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात यशस्वी ठरलेल्या संदेश पारकर यांची शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट घेतली. त्यामुळे संदेश पारकर हे लवकरच शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता गडद झाली आहे. विनायक राऊत यांनी शनिवारी संदेश पारकर यांच्या घरी जात नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. यामुळे संदेश पारकर यांच्या सेनाप्रवेशाची जोरदार चर्चा सिंधुदुर्गात सुरू झाली. कॉँग्रेसमध्ये नाराज असलेले संदेश पारकर युतीतील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते. नगराध्यक्ष निवडीत कॉँग्रेसविरुद्ध बंड पुकारल्यानंतर कॉँग्रेसमधून ते बाहेर पडणार हे निश्चितच झाले. शनिवारी खासदार राऊत यांच्या भेटीने ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळकटी मिळाली. यावेळी भाजपचे चिटणीस राजन तेली, संदेश पारकर, राजन वराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, रूपेश नार्वेकर, आदी उपस्थित होते. राऊत म्हणाले, आम्हाला कणकवली नगरपंचायतीमध्ये कलूषित राजकारणाचा अनुभव आला. नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार निधीतून काही कामे प्रस्तावित केली असतानाही निधी नाकारण्यात आला. संदेश पारकर हे वाहत्या गंगेत हात धुऊन घेणाऱ्यांपैकी नाहीत. संदेश पारकर यांची कॉँग्रेसमध्ये घुसमट करण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी संदेश पारकर, आमदार वैभव नाईक यांच्यासारखी मंडळी आहेत. कणकवली विकासाकडे झेपावणारे शहर असून, अनेक समस्याही आहेत. (प्रतिनिधी) पारकरांना उभारी देण्याचा प्रयत्न करतोय यावेळी संदेश पारकर हे हरहुन्नरी कार्यकर्ते असून, आम्ही त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही अटीशर्तींशिवाय त्यांना आम्ही पाठबळ देत आहोत. सर्वांत जास्त गद्दारी करणाऱ्यांनी दुसऱ्यांवर गद्दारीचे आरोप करू नये, अशी नारायण राणे यांचे नाव घेता राऊत यांनी टीका केली. संदेश पारकर नगराध्यक्ष असताना कणकवलीचा विकास चांगला झाला. पुन्हा आता त्यांच्या हातात शहराची धुरा आली आहे. अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी यशस्वीपणे नगराध्यक्षपदाची कारकीर्द पार पाडली.