शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक हिरमुसले

By admin | Updated: July 3, 2016 23:37 IST

पालिका निवडणूक : ’ते’ नगरसेवक नवीन वॉर्डच्या शोधात...

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभागांची नव्याने फेररचना करण्यात आल्यांनतर २ जुलैला झालेल्या नगरसेवकपदांच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांचे पत्ते गुल झाले आहेत, तर जुन्या ७ प्रभाग व २८ वॉर्ड्सची १५ प्रभाग व ३० वॉर्ड अशी फेररचना झाल्यानेही येत्या पालिका निवडणुकीत मतांची गोळाबेरीज करताना नाकीदम येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. फेररचनेत आपला जुना वॉर्ड किती आहे व किती दुसऱ्या वॉर्डमध्ये गेला, याबाबतचे चित्र नवीन प्रभागरचना येत्या १५ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या राजकीय क्षेत्रात ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी पालिकेची निवडणूक येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा आपले बस्तान आपल्या वॉर्डमध्ये बसवता यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रभाग व वॉर्ड फेररचना कोणाच्या पथ्यावर पडणार व कोणाच्या नाही, यावरच विद्यमान व इच्छुकांचे येत्या निवडणुकीतील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. रत्नागिरी पालिकेला आता २८ऐवजी ३० वॉर्ड मिळाल्याने ३० नगरसेवक संख्या राहणार आहे. सध्या पालिकेतील २८ नगरसेवकांमध्ये १५ शिवसेना, ८ भाजप, ४ राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस असे पक्षीय बलाबल आहे. पालिकेतील सेना-भाजप युती दोन वर्षांपूर्वीच तुटली आहे. युतीमार्फत सत्तेवर आल्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपला झाला आहे. भाजपला पावणेचार वर्षे नगराध्यक्षपदाचा कालावधी मिळाला आहे. युती तोडल्यानंतर भाजपने नगराध्यक्षपद सोडले नाही. त्यामुळे शिवसेनेचा भाजपवर रोष आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उमेश शेट्ये यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डमध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र, प्रीती सुर्वे, बाळू साळवी, संजय साळवी व राहुल पंडित या विद्यमान नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये आरक्षण पडल्याने त्यांना दुसऱ्या वॉर्डचा शोध घ्यावा लागणार आहे. एकूणच रत्नागिरीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. (प्रतिनिधी) उमेश शेट्ये : रत्नागिरी पालिकेत कॉँग्रेसबरोबर आघाडी होणार रत्नागिरी पालिकेत सेना-भाजपची तुटलेली युती पुन्हा होण्याची शक्यता सध्या तरी धुसर असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांची आघाडी होणार असल्याचे संकेत आहेत. रत्नागिरीत पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठीही वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. पालिकेची येणारी निवडणूक आघाडी करून लढवण्यात येणार आहे. जिल्हा प्रभारी माजी मंत्री भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम व अन्य नेते यांची कॉँग्रेस नेत्यांबरोबर बैठक होऊन आघाडी होईल, असे नगरसेवक उमेश शेट्ये म्हणाले. ४जुने वॉर्ड किती सुरक्षित हे फेररचना जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार. ४आरक्षणे पडल्याने अनेकांचा अन्य वॉर्डचा शोध. ४वॉर्ड फेररचनेवर अनेकांचे भवितव्य अवलंबून. ४सेना-भाजप युतीची शक्यता धुसर. ४नव्या रचनेनुसार १५ प्रभागातील ३० वॉर्डमध्ये होणार निवडणूक.