रत्नागिरीत मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणारे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:57 IST2025-02-03T15:57:05+5:302025-02-03T15:57:24+5:30
रत्नागिरी : पावस व रत्नागिरी शहर परिसरात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्यांची चाेरी करणाऱ्या चाैघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात ...

रत्नागिरीत मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणारे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : पावस व रत्नागिरी शहर परिसरात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्यांची चाेरी करणाऱ्या चाैघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या चाैघांनी गुन्हे कबूल केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व साहित्य असा ६,२७,००० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे.
राहुल कुंदन ताेडणकर (२९, शिवलकरवाडी, अलावा-जाकिमिऱ्या, रत्नागिरी), शुभम नीलेश खडपे (२४, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी), मुस्तफा गुडू पठाण (२२, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) आणि विकास महेश सुतार (१९, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) अशी चाैघांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावस व रत्नागिरी शहर परिसरात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्या चाेरीला जाण्याचे प्रकार वाढले हाेते. याप्रकरणी पूर्णगड पाेलिस स्थानक व रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
या चाेऱ्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला हाेता. या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गाेपनीय माहितीच्या आधारे चाैघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी बॅटरी चाेरी केल्याची कबुली दिली आहे.
या पथकात सहायक पाेलिस निरीक्षक प्रमाेद वाघ, पाेलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेडकाॅन्स्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील, अमित कदम, पाेलिस नाईक दत्तात्रय कांबळे यांचा समावेश हाेता.
पाच गुन्हे उघडकीला
पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या चाैघांनी बॅटरी चाेरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये पूर्णगड पाेलिस स्थानकात चार व रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात एक गुन्हा दाखल आहे.