शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या अतिरेकी भूमिकेनेच महायुती तुटली

By admin | Updated: October 4, 2014 23:56 IST

राज्यातील आघाडी सरकारने केवळ विकासाची स्वप्नेच

नितीन गडकरी : राज्यातील आघाडी सरकारने केवळ विकासाची स्वप्नेच दाखविल्याची टीका रत्नागिरी : भाजपने शिवसेनेबरोबर २५ वर्षे युती जपली. अनेक अडचणी आल्या तरी भाजपने सामंजस्याची भूमिका घेतली. भांडणे टाळली; मात्र यावेळी १५१ पेक्षा एकही जागा कमी करणार नाही यावर शिवसेना अडून बसली. मुख्यमंत्री सेनेचाच होणार अशी घोषणा करून ज्याचे आमदार अधिक निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री या ठरलेल्या संकेताला हरताळ फासला. शिवसेनेच्या या अतिरेकी भूमिकेमुळेच आम्हाला युती तोडण्यावाचून पर्याय उरला नाही, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात भाजपचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांच्या प्रचारसभेत गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप उमेदवार माने, माधवी माने, भाजपचे राजापूरचे उमेदवार संजय यादवराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, इब्राहिम खान, गोव्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, जनुभाऊ काळे, जे. पी. जाधव, आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील आघाडीच्या सरकारने विकासाची स्वप्ने दाखवीत राज्याचा सत्यानाश केला. राज्याचा विकास काही झाला नाही; मात्र कॉँग्रेस नेते, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या कार्यकर्त्यांचाच विकास झाल्याचा आरोप गडकरी यांनी केला. राज्यातही घराणेशाहीला ऊत आला आहे. मोदी यांनी सत्तेत येताच खासदाराचा मुलगा खासदार होणार नाही, अशी घोषणा करून घराणेशाहीलाच विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी) (प्रतिनिधी) रत्नागिरी मतदारसंघातील पक्षबदलूपणाच्या वृत्तीवर गडकरी यांनी कडाडून टीका केली. राष्ट्रवादीने सर्वकाही देऊनही एका रात्रीत पक्षाचे कपडे बदलणाऱ्या पक्षबदलूंना जनता निवडून देणार काय, असे कार्यकर्त्यांनी जनतेला विचारावे, असेही गडकरी म्हणाले.