कोरोनाला प्रतिबंधासाठी लोवले ग्रामपंचायतीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST2021-04-30T04:41:00+5:302021-04-30T04:41:00+5:30

देवरुख : लोवले गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी ग्राम कृती दल सिद्ध झाले आहे. सरपंच ऋतृजा ...

Lowley Gram Panchayat initiative to ban corona | कोरोनाला प्रतिबंधासाठी लोवले ग्रामपंचायतीचा पुढाकार

कोरोनाला प्रतिबंधासाठी लोवले ग्रामपंचायतीचा पुढाकार

देवरुख : लोवले गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी ग्राम कृती दल सिद्ध झाले आहे. सरपंच ऋतृजा कदम, तसेच उपसरपंच संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

ग्राम कृती दलाला विविध साधने दिली असून, त्याद्वारे मदत वाड्यातून पुरविली जात आहे. ग्रामपंचायतीने सभा घेत विविध वाड्यांतून काय उपाययोजना करण्यात यावी, त्याचे नियोजन केले. त्यानुसार वाडी वस्तीतून मदत पुरविली जात आहे. कोरोनाबाधित असलेल्या ठिकाणी सॅनिटायझरद्वारे फवारणी, तसेच सरपंच ऋतुजा कदम यांनी विविध ठिकाणी भेटी देत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस पाटील पवार यांच्यासह ग्राम कृती दलाचे सदस्य उपस्थित होते, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवाही पुरविण्याचे काम करण्यात येत आहे.

Web Title: Lowley Gram Panchayat initiative to ban corona