कोट येथे वटवृक्ष कोसळून शिवसेना शाखेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:43 IST2019-06-15T17:43:13+5:302019-06-15T17:43:48+5:30
कोट बसस्टॉप येथील जुनाट वटवृक्ष गुरुवारी दुपारी जोरदार पडलेल्या पावसाने शिवसेना शाखेवर कोसळल्याने शाखेचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे.

कोट येथे वटवृक्ष कोसळून शिवसेना शाखेचे नुकसान
लांजा : कोट बसस्टॉप येथील जुनाट वटवृक्ष गुरुवारी दुपारी जोरदार पडलेल्या पावसाने शिवसेना शाखेवर कोसळल्याने शाखेचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे.
कोट बस थांब्यावर शिवसेनेची शाखा बांधण्यात आली आहे. शाखेजवळच जूनाट वटवृक्ष गेली अनेक वर्षे दिमाखात उभा होता. गेली दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या पाऊस व आलेल्या वाऱ्याने जुनाट वटवृक्ष गुरुवारी दुपारी १ वाजता शिवसेना शाखेवर पडल्याने जवळपास १० पत्रे फुटले.
कोट शाखेच्या आसऱ्याला गाडीची वाट पाहत बसलेले प्रवासी मोठ्या प्रमाणात याठिकाणी असतात. हा वटवृक्ष पडला, त्यावेळी येथील गाडी येऊन गेल्याने येथे प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कोट तलाठी रामचंद्र्र गोरे यांनी पंचनामा करून ८ हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.