शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

चिनी वस्तंूद्वारे ग्राहकांची लूट

By admin | Updated: November 15, 2015 23:51 IST

रत्नागिरी शहर : बिल देण्यास टाळाटाळ; स्वस्ताईचे आमिष दाखवून भरमसाठ किंमती

रत्नागिरी : एकीकडे स्वदेशीचा पुरस्कार करत असताना बाजारात चिनी वस्तूंनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. मात्र, या वस्तूंच्या किंमती भरमसाठ ठेवल्याने व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी वस्तूचे बिल मागितल्यास त्यांना ते देण्यात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार रत्नागिरीत घडत आहेत.भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंनी आता गिळंकृत केली आहे. मुक्त व्यापारी धोरणामुळे परकीय राष्ट्रांसाठी भारतीय बाजारपेठ आता कुरण बनली आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंमुळे कसबी कारागीर बेकार झाले आहेत. हस्त वस्तूंच्या किंमती परवडत नसल्याने त्यांची मागणी रोडावली आहे. मात्र, त्या कारागीरांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बाजारात येणाऱ्या वस्तूंवर मेड इन चायना किंवा मेड इन जपान असा शिक्का मारलेलाच असतो. त्यामुळे भारतीय वस्तू आहेत कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. या वस्तू स्वस्त मिळत असल्याने ग्राहक त्यांना अधिक पसंती देत आहे, पण या वस्तूंच्या दर्जाबाबत कोणीच बोलू शकत नाही. दुकानात घेतलेली वस्तू दुकानातून बाहेर पडल्यानंतर नादुरूस्त झाल्यास आपण काहीच करू शकत नाही.बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईल्स, गृहोपयोगी वस्तू चायना मेड असल्याने त्यांच्या किंमती कमी आहेत. मुळातच या वस्तू अत्यल्प किंमतीला दुकानदारांना मिळत आहे. त्यांनी आपल्या दुकानात या वस्तू ठेवल्यानंतर त्यांच्या भरमसाठा किंमती ठेवल्या जात आहेत. रत्नागिरी शहरातदेखील चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यावर आकर्षक गिफ्ट ठेवून ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वस्तू खरेदी केल्यानंतर या वस्तूंचे बिल मागतल्यास दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे. ‘वस्तू पाहिजे तर घ्या’ असे सांगून ग्राहकांना परत पाठविले जाते. ही वस्तू घेतल्यानंतर त्यात बिघाड झाल्यास काहीच करू शकत नाही. चिनी बनावटीच्या वस्तुंमुळे होणारी लूट थांबविण्यासाठी ग्राहक मंचाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)नो गॅरंटी : ग्राहक मंच सुस्तावलेलाग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक मंच कार्यरत आहे. पण, हा मंच केवळ ग्राहकांनी तक्रार दिली तरच त्याची दखल घेत आहे. जोपर्यंत तक्रार नाही तोपर्यंत कारवाई नाही, असा होरा असल्याने ग्राहकांची फसवणूक होऊनही ग्राहक मंच बघ्याची भूमिका घेत आहे. ग्राहक मंचाकडून दुकानांवर धाडी टाकण्याचे प्रकार होत नसल्याने शहरातील दुकानदार निर्ढावलेले आहेत.‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत ग्राहकांना जागरूक होण्याचा उपदेश शासक देत आहेत. शासनाच्या या धोरणानुसार अनेक ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडे त्याचे बिल मागत आहे. मात्र, हे बिल देण्यास दुकानदार टाळाटाळ करत असून, या मालाची ‘नो गॅरंटी’ असल्याचे सांगून ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. विकलेल्या मालाची कोणतीच हमी देण्यास दुकानदार तयार नसतो.मूळ किंमत कमीचिनी वस्तू अल्प दरात विकल्या जात असल्याचे भासविले जाते. मुळातच या वस्तूंची किंमत खूपच कमी असते. पण त्या भरमसाठ किमतीने विकतात.