धनगर समाजाच्या समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न करू : प्रशांत यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:20+5:302021-06-02T04:24:20+5:30

अडरे : धनगर समाजाच्या समस्या साेडविण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू़ मी सदैव तुमच्या सोबत असेन, अशी ग्वाही चिपळूणचे ...

Let's try to solve the problems of Dhangar Samaj: Prashant Yadav | धनगर समाजाच्या समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न करू : प्रशांत यादव

धनगर समाजाच्या समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न करू : प्रशांत यादव

अडरे : धनगर समाजाच्या समस्या साेडविण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू़ मी सदैव तुमच्या सोबत असेन, अशी ग्वाही चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चिपळूण शहरातील खेंड येथे साजरी करण्यात आली़ यावेळी मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते़

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, चिपळूण युवक काँग्रेस शहराध्यक्ष फैसल पिलपिले तसेच युवक काँग्रेसचे प्रवक्ते यश पिसे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून उपस्थित मंडळींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

तसेच सध्याच्या केंद्र सरकारच्या फसव्या धोरणामुळे राजकीय पटलावर धनगर समाज नेहमी उपेक्षित राहिला असल्याची खंत यश पिसे यांनी व्यक्त केली.

तसेच सोनललक्ष्मी घाग यांनी महिलांशी संवाद साधला आणि समाजातील महिलांनी राजकीय क्षेत्रात येऊन स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला सुरेश पिसे, विष्णू पिसे, सचिन पिसे, सिद्धार्थ पिसे, उद्धव पिसे, विजय पिसे, सारंग भांड, रूपेश जाडकर, तसेच शुभांगी पिसे, प्रेमला पिसे, सुवर्णा पिसे, मंगल पिसे, सुनीता पिसे उपस्थित होते.

--------------------------

चिपळूण तालुक्यातील खेंड येथे अहिल्यादेवी हाेळकर यांची जयंती साजरी करण्यात आली़ यावेळी प्रशांत यादव, साेनललक्ष्मी घाग, फैसल पिलपिले, यश पिसे यांच्यासह समाजबांधव उपस्थित हाेते़

Web Title: Let's try to solve the problems of Dhangar Samaj: Prashant Yadav