कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील पोलिस स्थानकाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:30 IST2025-08-25T19:29:37+5:302025-08-25T19:30:16+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सोमवारी (दि. २५) रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सरकार रेल्वे पोलिस स्थानकाचे उद्घाटन सरकार रेल्वे पोलिसांचे ...

कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील पोलिस स्थानकाचे उद्घाटन
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सोमवारी (दि. २५) रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सरकार रेल्वे पोलिस स्थानकाचे उद्घाटन सरकार रेल्वे पोलिसांचे महासंचालक प्रशांत बुराडे आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, रत्नागिरीचे प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, रेल्वे पोलिस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, रेल्वे पोलिस सहायक आयुक्त नीलिमा कुलकर्णी, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी उपस्थित होते.
सध्या स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी ५० पोलिस कर्मचारी आणि १०९ होमगार्ड तैनात करण्यात आल्या आहेत. या पोलिस स्थानकाच्या माध्यमातून रेल्वेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे अधिक पोलिस कर्मचारी रत्नागिरीमध्ये उपलब्ध होतील आणि त्यातून गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या वेळी अधिक उपयोग होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.