शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam Result 2025: सलग चौदाव्या वर्षी कोकणचा राज्यात झेंडा, विभागात सिंधुदुर्ग प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:24 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात ...

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात कोकण बोर्डाने अव्वल क्रमांक मिळविला. दरवर्षीप्रमाणे कोकण बोर्डात सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के लागला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.६७ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.७४ टक्के लागला आहे.कोकण बोर्डांतर्गत एकूण २४३ महाविद्यालये असून, ६१ परीक्षा केंद्रे आहेत. कोकण बोर्डांतर्गत एकूण २३ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९६.७४ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल अधिकशाखानिहाय निकालामध्ये बोर्डात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.१६ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०६ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९२.२१ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ९७.१३ टक्के लागला आहे. टेक्निकल सायन्सचा निकाल ९२.१५ टक्के लागला आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिककोकण बोर्डात एकूण ११ हजार ४१८ मुले उत्तीर्ण झाली असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५० टक्के आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०३ टक्के आहे. तुलनात्मकदृष्ट्या मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.५३ टक्क्यांनी अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा ९५.६७ टक्के निकालरत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ हजार ६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९५.६७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमसिंधुदुर्ग जिल्ह्याने यंदाही सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८,२६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, जिल्ह्यातील ८,१६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९८.७४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.२३ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२७ टक्के आहे. जिल्ह्यातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गHSC Exam Resultबारावी निकालkonkanकोकण