शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कान्होजी आंग्रे सागरी मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ

By admin | Updated: January 14, 2015 00:40 IST

तुषार वाळुंजकर : महाराष्ट्र एनसीसी व महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राष्ट्रीय एन. सी. सी. मुख्यालय, मुंबई व दोन महाराष्ट्रा नेव्हल युनिट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सरखेल कान्होजी आंग्रे कोकणरत्न सागरी मोहिमेला दि. १८ जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती नागपूरचे एन. सी. सी. कमांडिंग आॅफीसर कॅ. तुषार वाळुंजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी कमांडिंग आॅफीसर कर्नल पी. वाय. परबते उपस्थित होते.महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी., रत्नागिरीतर्फे सहावी सागरी नौका भ्रमण मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेत दोन शिडाच्या २७ फुटी बोटीतून दहा दिवसात दहा बंदरांना भेट देण्यात येणार आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ मुलगे व ११ मुली तसेच भूदल व वायू दलातील मिळून एकूण ४४ छात्रसैनिक, दोन अध्यापकीय एनसीसी आॅफीसर, ६ नौसैनिक, १ नौका प्रतिमान निदर्शक, प्रशिक्षित लिपिक, लेखालिपिक, वाहनचालक, लष्कर आदी सहभागी होणार आहेत. दोन शिडांच्या नौकांसह दोन मोठ्या मच्छिमारी नौका व एक यांत्रिक बोट यात सहभागी होणार आहे.छात्रसैनिकांच्या धाडसी व पाण्यातील साहसी वृत्तीला चालना देणे, तसेच त्यांच्यामध्ये विश्वास, शक्ती, मानसिक वृत्ती बळकट करणे व दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॅ. वाळुंजकर यांनी दिली. मुक्कामाच्या गावात पथनाट्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणयात येणार आहे. स्त्रीमुक्ती सुधारणा, प्रथमोपचार, पर्यावरण समतोल, समुद्री पर्यावरण समतोल, स्वच्छता अभियान याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच भारताच्या तिन्ही दलात किंवा तटरक्षक दलांमध्ये ग्रामीण युवकांना समाविष्ट होण्यास लागणाऱ्या शैक्षणिक व शारीरिक प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे.दोन शिडांच्या बोटीतील केवळ कॅन्व्हासच्या शिडाच्या माध्यमातून ५२० किलोमीटर सागरी प्रवास करण्यात येणार आहे. दि. १८ रोजी मोहिमेला देवगड पोर्ट बंदर येथून प्रारंभ होणार असून, विजयदुर्ग येथे मुक्काम आहे. १९ रोजी विजयदुर्ग ते रत्नागिरी, दि. २० रोजी रत्नागिरी ते जयगड, दि. २१ रोजी जयगड ते हर्णै, दि. २२ रोजी हर्णै ते मुरूड (आगरदांडा), दि. २३ रोजी मुरूड (आगरदांडा) ते अलिबाग दि. २४ रोजी मुक्काम असून, दि. २५ रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ होणार आहे. दि. २५ रोजी अलिबाग ते रेवदंडा, दि. २६ रोजी रेवदंडा ते श्रीवर्धन, दि. २७ रोजी श्रीवर्धन ते दाभोळ, दि. २८ रोजी दाभोळ ते रत्नागिरी असा प्रवास होणार आहे. (प्रतिनिधी)मोहिमेत दोन शिडाच्या बोटीतून दहा दिवसात दहा बंदरांना भेट देण्यात येणार.\रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ मुलगे व ११ मुली तसेच भूदल व वायू दलातील मिळून एकूण ४४ छात्रसैनिक, दोन अध्यापकीय एनसीसी आॅफीसर, ६ नौसैनिक, १ नौका प्रतिमान निदर्शक सहभागी होणार.