शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत काँग्रेसला सक्षम तालुकाध्यक्ष मिळणे कठीण

By admin | Updated: July 8, 2014 00:21 IST

अध्यक्षपद : बाळ बेलोसे, भाऊ मोहिते, पुसाळकर यांची नावे

शिवाजी गोरे ल्ल दापोलीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली काँग्रेस संघटनेमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात येत आहेत. व्होट बँकेवर डोळा ठेऊन शिवसेनेने विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी संदीप राजपुरे व तालुका प्रमुखपदी शांताराम पवार यांची निवड केल्यानंतर काँग्रेसनेही त्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, काँग्रेसला अध्यक्ष मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळेच विद्यमान तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर महिना उलटून गेल्यानंतरही तो मंजूर केला जात नाही, अशी चर्चा सुरु आहे. दापोलीत गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पूर्वी या भागातून भाई जगताप उभे राहायचे. आता या ठिकाणी नवे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकल, अ‍ॅड. वसंत मेहेंदळे, मधुकर दळवी, रमेश जाधव, अ‍ॅड. विकास मेहता यांनी प्रयत्न केले असले तरी पक्षाला बळकटी प्राप्त झाली असे म्हणता येत नाही. याशिवाय बाळ बेलोसे, भाऊ मोहिते यांनी प्रयत्न सुरु ठेवले असले तरी गटातटाच्या राजकारणात तालुकाध्यक्षपदापासून हे दोघेही बाजूला राहिले. ऐनवेळी भाऊ मोहिते यांच्या तोंडचा घास काढला गेला. रमेश जाधव यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या पदासाठी अद्याप शोधाशोध सुरुच आहे. त्यावेळी विकास मेहता यांची वर्णी लागली. मात्र, गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले. लोकसभा निवडणुकीत हे वाद चव्हाट्यावर आले होते. निवडणूक निकालानंतर मेहता यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतर आजपर्यंत या पदावर अद्याप अध्यक्ष नेमण्यात आलेला नाही. या पदावर नक्की कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.