खेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:51 IST2020-11-04T18:49:52+5:302020-11-04T18:51:38+5:30
khed, Police, Muncipal Corporation, Ratnagiri नगर परिषद क्षेत्रात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील नाना-नानी पार्क जवळ, क्षेत्रपाल नगर, खांबतळे, महाड नाका, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ व अन्य विविध प्रभागात पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली. ही मोहीम आगामी कालावधीत अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.

खेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र
खेड : नगर परिषद क्षेत्रात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील नाना-नानी पार्क जवळ, क्षेत्रपाल नगर, खांबतळे, महाड नाका, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ व अन्य विविध प्रभागात पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली. ही मोहीम आगामी कालावधीत अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.
खेड शहरात नगर परिषदेने परवानगी दिलेले खोकेधारक, खासगी मालकीची दुकाने, व्यापारी संकुलातील दुकानदारांनी दुकानाबाहेर केलेले गटार व रस्त्यावरील अतिक्रमण यांच्या विरोधात ३ रोजी धडक मोहीम हाती घेतली. जेसीबी व अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका सफाई कर्मचारी यांना सोबत घेऊन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी खेड बसस्थानक, बाजारपेठ परिसरात दुकानांची पाहणी करत ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळले त्यातील काही ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमण हटवण्यात आले.
काही ठिकाणी दुकानदारांनी स्वतः अतिक्रमण काढून टाकण्याची तयारी दाखवल्याने त्यांना तत्काळ अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना करण्यात आली. शहरात काही ठिकाणी पालिकेचे अधिकारी व दुकानदार यांच्यासोबत वादाचे प्रसंग उदभवले.
या कारवाईबाबत माहिती देताना मुख्याधिकारी शिंगटे म्हणाले की, पालिकेच्या क्षेत्रात अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी असून, रस्ते, गटारे यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आगामी कालावधीत सुरूच राहणार आहे. किंबहुना ती अधिक तीव्र होणार आहे. सरकारी जागेवर अनधिकृतपणे केली बांधकामे नागरिकांनी स्वत: काढून टाकावीत अन्यथा पालिका त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता धडक कारवाई करेल. शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.