शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातूनच भारतीय संस्कृतीची ओळख

By admin | Updated: October 18, 2015 23:58 IST

कोमसापच्या जिल्हा संमेलनात नायगावकर यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : साहित्यामुळे इतिहास, जीवन व्यवस्था कळते. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच भडकलेल्या तुरडाळीचे भाव हे वास्तव साहित्यातूनच समजते. शंभर - दीडशे वर्षापूर्वीचे मराठी भाषेतील साहित्य, वाङ्मय आजही वाचकांना वेड लावते. भारतीय संस्कृतीची ओळख साहित्यातून जगाला झाली आहे. मराठी युवकांना उद्योग व्यवसायाद्वारे भारतीयपणाचे वेड लावता आले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले.कोकण मराठी साहित्य परिषद व कवी केशवसूत स्मारक, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, खासदार विनायक राऊत, कवी अरुण म्हात्रे, आमदार उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, कार्याध्यक्ष नमिता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, विश्वस्त अरुण नेरूरकर, भास्करराव शेट्ये, उर्मिला पवार, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, अण्णा राजवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.मारूती मंदिरपासून ढोलताशांच्या गजरामध्ये संमेलन स्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. प्र. ल. मयेकर व्यासपीठावर संमेलनाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविक केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी केले. स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत यांनी शारदोत्सवात आयोजित साहित्य संमेलन हा दुग्धशर्करा योग आहे, असे सांगितले. आमदार उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सादर केलेला प्रस्ताव केंद्र शासनाकडे पडून असल्याची खंत व्यक्त केली. साहित्याला राजाश्रयाची गरज आहे, तो राजाश्रय खासदार राऊत यांच्यामुळे मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. पुढील वर्षी रत्नागिरीमध्ये राज्यातील पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले.केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर यांनी सांगितले की, कोमसाप हे कोकणातील साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. कोमसापद्वारे तिसरी पिढी सक्रिय होत आहे. कोमसापद्वारे देवरूख येथे लवकरच युवा संमेलन होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. कोकण रेल्वेला ‘तुतारी एक्स्प्रेस’ नाव देण्याची कोमसापची जुनी मागणी असून, त्याची पूर्तता खासदार राऊत यांनी करावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुहागर शाखेने प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)