आदर्श चेअरमन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST2021-09-25T04:34:05+5:302021-09-25T04:34:05+5:30

बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड देवरूख : भद्रावती चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महिला खुल्या गट बाॅक्सिंग स्पर्धेसाठी महिला जिल्हा संघ जाहीर ...

Ideal Chairman Respect | आदर्श चेअरमन सत्कार

आदर्श चेअरमन सत्कार

बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड

देवरूख : भद्रावती चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महिला खुल्या गट बाॅक्सिंग स्पर्धेसाठी महिला जिल्हा संघ जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सायली संतोष मुणगेकर, चिपळुणातील स्नेहा सकपाळ या दोघींची निवड झाली आहे. चंद्रपूर येथे दि. २७ सप्टेंबर ते दि.१ ऑक्टोबर अखेर स्पर्धा होणार आहे.

पुरुषाेत्तम खांबल यांची निवड

राजापूर : तालुक्यातील धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते पुरुषोत्तम खांबल यांची निवड झाली आहे. महामार्गाच्या दुरवस्थेसह अनेक प्रश्नांना वाचा फोडून तालुक्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑनलाइन काव्य संमेलन

मंडणगड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मंडणगड तालुका शाखेतर्फे पाचवे राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ‘श्री गणेश’ या विषयावर स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्यात आले.

जीडीसी परीक्षा ऑक्टोबरमध्ये

रत्नागिरी : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जीडीसी ॲन्ड ए बोर्ड) कडून घेण्यात येणारी जीडीसी ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षेवरील स्थगिती उठविण्यात आली असून, दि. २३, २४ व २५ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Web Title: Ideal Chairman Respect