पेढांबे येथे पतीचे पत्नीवर कोयतीने वार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST2021-04-30T04:40:55+5:302021-04-30T04:40:55+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खालचीवाडी येथे पतीने पत्नीवर संशय घेत कोयतीने वार केल्याने पत्नी जखमी झाली आहे. पतीवर ...

Husband stabs wife at Pedhambe, wife injured | पेढांबे येथे पतीचे पत्नीवर कोयतीने वार, पत्नी जखमी

पेढांबे येथे पतीचे पत्नीवर कोयतीने वार, पत्नी जखमी

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खालचीवाडी येथे पतीने पत्नीवर संशय घेत कोयतीने वार केल्याने पत्नी जखमी झाली आहे. पतीवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रुपाली संतोष वेलोंडे (३०, रा. पेढांबे खालचीवाडी) हिने संगमेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पती संतोष पांडुरंग वेलोंडे हा दररोज दारू पिऊन रुपाली वेलोंडे हिच्यावर संशय घेतो. सोमवार २६ रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला होता. रुपाली वेलोंडे ही झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याला राग येऊन रात्री हातात कोयतीने रुपालीवर वार केले. यामध्ये तिच्या उजव्या बाजूस कानाच्या जवळ कोयतीने मारून दुखापत केली. तसे शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. रुपाली हिने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष वेलोंडे याच्यावर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

Web Title: Husband stabs wife at Pedhambe, wife injured