शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अवजारांचे सव्वा कोटी अनुदान रखडले

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

कृषी विभाग : संकेतस्थळही खुले होत नसल्याने पेच

रत्नागिरी : शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र, गतवर्षी (२०१३-१४) चे अनुदान कृषी विभागाकडे शासनाकडून प्राप्त झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.फळबागांमध्ये पावसात वाढलेले गवत सफाईचे काम सुरू आहे. थंडी सुरू झाल्यानंतर फवारणी करण्यात येते. मात्र, फवारणीपूर्वी बागांची सफाई करणे आवश्यक आहे. गतवर्षी ४२२ शेतकऱ्यांनी ग्रास कटरची मागणी केली होती. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर अवजारे पुरविण्यात येतात. ग्रासकटरसाठीचे ५४ लाख २५ हजाराचा निधी कृषी विभागाकडे प्राप्त झालेले नाही.लागवडीपूर्वी शेतीची नांगरणी करण्यासाठी नांगराचा वापर करण्यात येत होता. मात्र, नांगराने नांगरणीसाठी वेळ अधिक जातो, शिवाय मशागत तितकीशी चांगली होत नसल्यामुळे पॉवरटिलर व रोटरी टिलरचा वापर करण्यात येऊ लागला. गतवर्षीच १०० शेतकऱ्यांनी पॉवर टिलर व रोटरी टिलरची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्यांचे ६० लाख रूपये अनुदानाचे थकले आहेत. शेतकऱ्यांनी प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर कृषी विभागाकडून त्यास पूर्वसंमत्ती देण्यात येते. त्यानुसार शेतकरी स्वत: यांत्रिक अवजारे खरेदी करतात. शासनाकडून मंजूर निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. मात्र, गतवर्षीचे शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभाग संगणकीकृत केल्याने यावर्षीपासून प्रत्येक योजनेसाठीचे प्रस्ताव आॅनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ल्लँे.ल्ल्रू.्रल्ल संकेतस्थळ खुले होत नाही. शिवाय शेतकऱ्यांना आॅनलाईन प्रणालीबाबत कळत नाही. त्यामुळे या योजनेचा तर यावर्षी बोजवाराच उडाला आहे. (प्रतिनिधी)