अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ११६ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:19 IST2025-09-27T14:18:53+5:302025-09-27T14:19:08+5:30

नुकसानाचा आकडा आणखी वाढू शकतो.

Heavy rains cause collapse of bridges, culverts, and moats; Ratnagiri Zilla Parishad suffers loss of Rs 116 crore | अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ११६ कोटींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ११६ कोटींचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते, साकव, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या नुकसानाचे एकूण मूल्य ११६ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्यारत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागांकडून या नुकसानाची माहिती जमवण्याचे काम सुरू आहे. अंदाजे हा नुकसानाचा आकडा आणखी वाढू शकतो.

या वर्षी जिल्ह्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील आणि वाड्यांतील रस्ते नादुरुस्त होऊन त्यांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, गोठे, साकव, मोऱ्या तसेच पूल यांचेही नुकसान झाले आहे. साकव, पूल आणि मोऱ्यांच्या नुकसानग्रस्ततेमुळे जिल्ह्यातील वाहतूकही प्रभावित झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त रस्ते, पूल, मोऱ्या आणि साकव यांच्या दुरुस्तीकरिता आवश्यक निधीचा एकत्र प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

सध्या जिल्ह्यातील ४३९ रस्ते दुरुस्त झाले आहेत. त्याचबरोबर ७२ साकव आणि ६९ मोऱ्या व पुलांचे नुकसान झाले आहे. त्यांना दुरुस्त करण्यासाठी ११६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपयांची आवश्यकता आहे. अजूनही दुरुस्त झालेल्या रस्त्यांची, नुकसानग्रस्त साकव, मोऱ्या, पुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानाचा आकडा पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.

संपूर्ण नुकसानाची माहिती जमवण्यास काही दिवस लागतील. त्यानंतर एकूण झालेल्या नुकसानाचा आकडा तयार करून संबंधित प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जाईल. मात्र, शासनाने या नुकसानग्रस्तांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधकामासाठी वेळेवर निधी देणे अत्यावश्यक आहे.

नुकसानग्रस्त - संख्या - आवश्यक खर्च (लाखात)

  • नादुरुस्त रस्ते - ४३९ - ८,६५६.८०
  • पूल व मोऱ्या - ६९  -१,२५३.००
  • साकव - ७२ - १,७३०.००            
  • एकूण - ५८० - ११,६३९.८०


रत्नागिरी बांधकाम विभाग

  • नुकसान - ४,४६६.३५ (लाखात)
  • चिपळूण बांधकाम विभाग
  • नुकसान - ७,१७३.४५ (लाखात)

Web Title : भारी बारिश से पुलों को नुकसान; रत्नागिरी जिला परिषद को ₹116 करोड़ का नुकसान

Web Summary : भारी बारिश के कारण रत्नागिरी जिले में सड़कें, पुल और पुलिया क्षतिग्रस्त, ₹116 करोड़ का नुकसान। 439 सड़कें, 72 पुल और 69 पुलिया प्रभावित, तत्काल मरम्मत की आवश्यकता। धन का प्रस्ताव तैयार किया जा रहा है; समय पर सरकारी सहायता महत्वपूर्ण है।

Web Title : Heavy Rains Damage Bridges; Ratnagiri Zilla Parishad Suffers ₹116 Crore Loss

Web Summary : Ratnagiri district faces ₹116 crore loss due to heavy rains damaging roads, bridges, and culverts. 439 roads, 72 bridges, and 69 culverts are affected, requiring urgent repairs. Proposal for funds is being prepared; timely government aid is crucial.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.