चिपळूण (जि.रत्नागिरी) : अवैध दारू विक्रीची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचलेल्या पाेलिसांच्या पथकाला दाेन बंदुका आणि ९ जिवंत काडतुसे सापडली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (१८ मार्च) चिपळूण तालुक्यातील सावर्डे पाेलिस स्थानक हद्दीतील आगवे येथे केली. या कारवाईत पाेलिसांनी महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. आगवे-बौद्धवाडी, ता. चिपळूण) या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यावेळी मौजे आगवे येथे महेश जाधव हा घराच्या मागील बाजूला अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. पाहणीदरम्यान घराच्या मागील बाजूला असलेल्या जनावरांच्या गोठ्याजवळील लाकडी खोपटीत एक जण बंदुकीची साफसफाई करताना दिसला. त्यानंतर पाेलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे एक सिंगल बॅरल काडतूसची बंदूक सापडली. त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसे सापडली. हे सर्व साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
Web Summary : Police in Ratnagiri arrested a 35-year-old man in Aagve for illegal possession of two guns and nine live cartridges. The raid followed a tip about illegal liquor sales. A total of ₹70,900 worth of materials were seized.
Web Summary : रत्नागिरी पुलिस ने आगवे में अवैध रूप से दो बंदूकें और नौ जिंदा कारतूस रखने के आरोप में 35 वर्षीय व्यक्ति को गिरफ्तार किया। यह कार्रवाई अवैध शराब बिक्री की सूचना मिलने के बाद की गई। कुल ₹70,900 का सामान जब्त किया गया।