शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

तालिका समिती अध्यक्षपदी गुहागरचे आमदार भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 5:52 PM

ShivSena Bhaskar Jadhav Ratnagiri : गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले व विविध पदे भूषवलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने आणखी एक मानाचे पद मिळाले आहे. तालिका अध्यक्ष म्हणून काम करतानाच पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.

ठळक मुद्देतालिका समिती अध्यक्षपदी गुहागरचे आमदार भास्कर जाधवगुहागरला आणखी एक मानाचे पद मिळाले

गुहागर : गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले व विविध पदे भूषवलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने आणखी एक मानाचे पद मिळाले आहे. तालिका अध्यक्ष म्हणून काम करतानाच पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.शिवसेना पक्षातून चिपळूण मतदारसंघांमधून दोनवेळा आमदार पद भूषवले आहे. विधानसभेचे उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही यापूर्वी त्यांचा सन्मान झाला आहे. भास्कर जाधव यांच्यामधील अभ्यासू व्यक्तिमत्व व आक्रमक ओळखून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षामध्ये घेऊन पहिल्यांदा विधान परिषद आमदार म्हणून गुहागर मतदार संघाची जबाबदारी दिली.

त्यानंतर गेली वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत शिवसेनेच्या तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व भाजपचे विनय नातू यांचा पराभव करत निवडून आले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री व केंद्रीय मंत्री म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पदही भूषविले.विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करत शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. यावेळी पुन्हा एकदा मंत्रिपदी निवड होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती.

ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता भास्कर जाधव यांना विधानसभेचे सन्मानाचे तालिका अध्यक्ष पद देऊन एक प्रकारे शिवसेनेकडून जाधव यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीguhagar-acगुहागरShiv Senaशिवसेना