शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागावर पालकमंत्र्यांचा डोळा?

By admin | Updated: July 12, 2014 00:37 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती, कंपाऊंड वॉल बांधण्याच्या आराखड्याला शिक्षण समितीकडून मंजुरी दिली जाते़

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती, कंपाऊंड वॉल बांधण्याच्या आराखड्याला शिक्षण समितीकडून मंजुरी दिली जाते़ परंतु पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार निधी खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिली़ त्यामुळे आजच्या शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी प्रचंड गदारोळ करून पालकमंत्र्यांबद्दल संताप व्यक्त केला़आजची सभा सभापती सतीश शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य विलास चाळके, प्रकाश शिगवण, श्रीपत पवार, सुनील दळवी, विकास नलावडे, सदस्या वेदा फडके, नेहा माने, माधवी खताते, देवयानी झापडेकर, जान्हवी धाडवे व अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली़शाळा दुरुस्ती, नाविन्यपूर्ण योजनेतून कंपाऊंड वॉल बांधणे यासाठी नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ त्यासाठी शिक्षण व स्थायी सभेत आराखडा मंजूर करुन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जातो़ याबाबत आज झालेल्या सभेत यावर जोरदार चर्चा झाली़ जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यात आला असला तरी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तो खर्च करावयाचा असल्याने सदस्य व सभापतींनी त्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली़ शिक्षण समिती आणि जिल्हा परिषदेच्या हक्कांवर पालकमंत्र्यांकडून गदा आणण्याचा प्रकार आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी भावना या सभेत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. (शहर वार्ताहर)