शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळगड संरक्षित; मात्र सरकारचे अजूनही दुर्लक्षच

By admin | Updated: January 30, 2015 23:10 IST

हालचाल नाही : केवळ घोषणा; अंमलबजावणी नाही, दुसऱ्या वर्धापनदिनाची प्रतीक्षा असतानाच...

गुहागर : अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खासगी मालकीमध्ये अडकला आहे. शासनाने हा किल्ला संरक्षित स्मारक घोषित करुन काही वर्षे लोटली तरी त्यानंतर कोणतीही हालचाल नाही. यासाठी गुहागर येथील शिवतेज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे. १९ फेब्रुवारी या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी गोपाळगड किल्ला शासनाने ताब्यात घ्यावा, या आशयाचे पन्नास हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. संस्था स्थापनेपासून मागील दोन वर्षात शिवतेज फाऊंडेशनने ऐतिहासिक प्रबोधनासाठी व खासकरुन गोपाळगड खासगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडक कार्यक्रम राबविले. यामध्ये गोपाळगडावरील स्वच्छता मोहीम तसेच प्रख्यात व्याख्याते नितीन बाणगुडे पाटील व अन्य व्याख्यात्यांची निवडक व्याख्याने आयोजित केली. यापुढे गोपाळगडला खासगी मालकीतून मुक्त करुन गडप्रेमी व पर्यटकांसाठी गोपाळगड खुला करावा, यासाठी फाऊंडेशनने कंबर कसली आहे. याबाबत माहिती देताना अ‍ॅड. संकेत साळवी म्हणाले की, गोपाळगडावर गेली अनेक वर्षे शासनातर्फे झेंडा वंदन होत असते. मात्र, याची सरकार दरबारी नोंद केली जात नाही. यापुढे ही नोंद व्हावी, याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे चर्चा झाली आहे. जनभावना लक्षात घेऊन शासनाने कायदेशीर प्रक्रियेमध्ये न अडकता आज ज्या ठिकाणी गोपाळगड उभा आहे ते क्षेत्र शासनाने संपादित करावे, अशी आमची मागणी आहे. यावेळी फाऊंडेशनचे डॉ. बाळासाहेब ढेरे, संतोष वरंडे, नीलेश गोयथळे, मनोज बारटक्के, अलंकार विखारे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण असणारा हा किल्ला सरकारी अनास्थेमुळे युनूस मणियार नावाच्या खासगी व्यक्तीच्या मालकी हक्काखाली गेला आहे. सागरी सुरक्षेसाठी बांधलेल्या या किल्ल्याची काही तटबंदी तोडण्यात आली आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खासगी मालकांकडून हॉटेल व्यवसाय व अन्य व्यापारांकरिता होऊ शकेल, अशी भीती शिवप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला शासनाने त्वरित ताब्यात घ्यावा, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. या स्मारकाबाबत केवळ घोषणाबाजी झाली. मात्र, पुढे स्मारकाच्या दृष्टीने शासनाकडून अंमलबजावणी झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)या निवेदनावर ५० हजार सह्यांसाठी मोहीम राबवली जात असून, १९ फेब्रुवारीला शिवतेज फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनी शृंगारतळी तसेच गुहागरमधून शिवाजी चौक ते तहसील कार्यालय, अशी अस्मिता रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांनाही देण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. संकेत साळवी यांनी सांगितले.