शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडचे इरले, घोंगडी झाले दुर्मीळपरंपरेला छेद ; अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST

नीलेश जाधव : मार्लेश्वर, भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे.

नीलेश जाधव : मार्लेश्वर, भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे. आधुनिक युगात प्लास्टिकच्या रेडीमेड वस्तू बाजारात आल्याने या वस्तू वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इरले व घोंगडीचा वापर आपोआप कमी झाला आहे. परिणामी इरले, घोंगडी दुर्मीळ झाली आहे.पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी भातलावणीची कामे करताना शेतकरी इरले व घोंगडीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असत. शेतकरी स्वत: इरले तयार करीत असत, तर घोंगडी विकत घेतली जात असे. एकदा तयार केलेले इरले किमान दहा वर्षे सहज होते. घोंगडीसुद्धा अनेक वर्षे टिकत असे. वारा आणि पावसाचा इरले व घोंगडीवर कोणताही परिणाम होत नाही. मुसळधार पावसात घोंगडीमुळे उबदारपणा येत असे. त्यामुळे इरले व घोंगडीलाच शेतकऱ्यांची जास्त पसंती असायची. इरले व घोंगडी वापरल्याने पावसापासून शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होत होता. घोंगडीमुळे तर थंडीपासून शरीराला उबही मिळत होती. सगळ्याच शेतकऱ्यांकडे इरले व घोंगडी असल्याचे पाहावयास मिळत होते. आता जमाना बदलल्याने इरले व घोंगडी दिसणेही दुरापास्त झाले आहे. सध्याच्या युगात प्लास्टिकच्या विविध रेडीमेडी वस्तू बाजारात उपलब्ध होत जुन्या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत.आता शेतीची कामे करताना रेनकोट, प्लास्टिक कागद, प्लास्टिक टोप्या, गमबूट आदी रेडीमेड वस्तूंचा वापर करण्यावर आताच शेतकरी अधिक भर देत आहे.