Ratnagiri: मिनीबसला धडक दिलेल्या टँकरमधून गॅस गळती; ३० शिक्षक जखमी, दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:34 IST2025-06-09T13:34:30+5:302025-06-09T13:34:54+5:30
रत्नागिरी : जयगडहून मुंबईच्या दिशेने एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर चालकाने नियंत्रण सुटून मिनी बसला समाेरून जाेरदार धडक दिल्याची ...

Ratnagiri: मिनीबसला धडक दिलेल्या टँकरमधून गॅस गळती; ३० शिक्षक जखमी, दोन गंभीर
रत्नागिरी : जयगडहून मुंबईच्या दिशेने एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर चालकाने नियंत्रण सुटून मिनी बसला समाेरून जाेरदार धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई-गाेवा महामार्गावरील निवळी (ता. रत्नागिरी) येथे घडली. या अपघातात चालकासह ३१ जण जखमी झाले आहेत. त्यातील दाेघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेले सर्व शिक्षक आहेत. या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात आलेली नव्हती.
एलपीजी गॅस घेऊन टँकर (एनएल ०१, एन ४६२८) हा जयगड येथून मुंबईकडे चालला होता. तो सकाळी ८:४५ वाजण्याच्या दरम्यान निवळी येथील बावनदीच्या अलीकडील उतारावर आला असता चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी तो समोरून येणाऱ्या मिनी बसवर (एमएच ०२, ईआर ९६०३) आदळला. या बसमधून चिपळूण येथून शिक्षक प्रशिक्षणासाठी रत्नागिरीत येत हाेते. टँकरच्या धडकेने ही बस २५ ते ३० फूट खोल दरीत जाऊन उलटली. जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून व अन्य १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले, तसेच पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह उपविभागीय पाेलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू करण्यात आली नव्हती.
जखमींची नावे
मिनी बस चालक संकेत कृष्णकांत जागुष्टे (वय २८, रा. कुटरे, चिपळूण), विराज राजाराम सावंत (वय ४१, रा. सावर्डे), स्मिता मधुकर पाटील (वय ४८, दहिवली, चिपळूण), उषा अमोल खुडे (वय ३१, रा. खेर्डी, चिपळूण), जयश्री सूर्यकांत गावडे (वय ५४, रा. सावर्डे), प्रियंका दिलीप जाधव (वय ३८, रा. सावर्डे), नेहा संतोष मेस्त्री (वय ४१, रा. सावर्डे), धर्मेंद्र दत्तात्रय दाेरुगडे (वय ५३, रा. चिपळूण), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे (वय ५३, रा. सावर्डे), सुलक्षणा संभाजी पाटील (वय ४०, रा. चिपळूण), निशिकांत दीनानाथ वानकर (वय ५१, रा. सावर्डे), वृषाली सूर्यकांत यादव (वय ५०, रा. खेर्डी), श्वेता संजय चव्हाण (वय ४८, रा. चिपळूण),
हर्षाली हेमंत पाकळे (वय ३६, निवळी, रत्नागिरी), नीता विनायक बांद्रे (वय ३९, रा. गाेवळकाेट, चिपळूण), मीना सुभाष घाडगे (वय ५२, रा. चिपळूण), कमलकिशोर किसान महाडिक (वय ३७, रा. चिपळूण), प्रेमकुमार बबन शिवगण (वय ४४, रा. चिपळूण), अमोल गणेश कोतवाल (वय ३५, रा. खेर्डी), मनीषा संतोष कांबळी (वय ४७, रा. खेर्डी), मालिनी दीपक चव्हाण (वय ४०, धारतळे), श्वेता संजय चव्हाण (वय ४८, रा. चिपळूण), राजेश यादव (वय ४७, रा. सावर्डे), गणेश महादेव सावर्डेकर (वय ४५, रा. सावर्डे), सुरेंद्र दीपक सावंत (वय ४०, चिपळूण), सचिन अशोक पाेकळे (वय ४३, रा. सावर्डे), उदय पांडुरंग खताते (वय ५२, रा. चिपळूण), अरविंद अनंत सपकाळ (वय ४६, रा. चिपळूण), रूपाली भुवड (वय ३९, रा. चिपळूण).
गंभीर जखमी
मंदा सुकदेव खाडे (वय ५३, रा. सावर्डे, चिपळूण) यांना काेल्हापूर येथे, तर मीना विनायक शिरकर (वय ३८, चिपळूण) यांना रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाणी मारून गॅस डायलाेट
गॅस गळतीनंतर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच गॅस गळती थांबवण्यासाठी माहीतगार नीलेश भोसले व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले हाेते. टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये ट्रान्स्फर करण्याचे प्रयत्न असफल झाल्याने टाकीवर पाणी मारून ताे डायलाेट करण्याचे काम सुरू हाेते.
जनावराचा होरपळून मृत्यू
भारत पेट्रोलियमची गॅसची गळती झाल्याने परिसरातील एका गोठ्याला आग लागली. त्यामध्ये एका जनावराचा होरपळून मृत्यू झाला आहे.
वाहतूक वळवली
अपघातस्थळी गॅस गळती होत असल्याने वाहतूक पोलिसांनी एक किलोमीटर परिसरातील वाहने थांबवून ठेवली हाेती, तसेच या मार्गावर गाेव्यावरून येणारी वाहने पाली व उक्षीमार्गे, तर मुंबईहून येणारी वाहने संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली आहेत.