शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्टिजन करणाऱ्यांची गर्ग यांनी केली विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाकाळात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी पोलीस यंत्रणेकडून अशा लोकांची अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी दिवसभर ...

रत्नागिरी : कोरोनाकाळात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी पोलीस यंत्रणेकडून अशा लोकांची अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी दिवसभर उन्हात काम करणाऱ्या पथकाची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी भेट घेत त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारपूस केली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या जलद गतीने वाढू लागली आहे. त्यांना थोपवण्यासाठी पोलीस यंत्रणा पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. सध्या पोलीस दल २४ तास कार्यरत आहे. लॉकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत, अशांना रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारताना व त्यांच्या कोरोना चाचण्या सक्तीने केल्या जात आहे.

अशा लोकांची अ‍ॅन्टिजन चाचणी करणारे पथक शहरातील मारुती मंदिर, मिरकरवाडा, धनजी नाका, कोकणनगर या ठिकाणी डॉक्टर, शिक्षक आदींचे पथक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लोकांचे अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्याचे काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम अविश्रांत सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी सोमवारी शहरातील नाकाबंदी असलेल्या ठिकाणांना भेट देतानाच या पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपली दखल घेतल्याबद्दल त्यांचा चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.

..................

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची पोलीस दलामार्फत अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. या ठिकाणी असलेल्या आरोग्य पथकास पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी भेट देऊन विचारपूस केली.