शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राजापुरात गंगामाई प्रकटली, १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 5:30 PM

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापुर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत ठरले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.

ठळक मुद्देराजापुरात गंगामाई प्रकटली१६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन

राजापूर : राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापुर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत ठरले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.मागील वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते व १५ नोहेंबर २०१८ला ती अंतर्धान पावली होती. जवळपास शंभराहुन अधिक दिवस तिचे वास्तव होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची व नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र गेल्या काही वर्षात गंगेच्या आगमन व गमन या कालखंडाला बदल झाला असल्याचे पहावयास मिळाले. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते.

गतवेळी १५ नोहेंबरला गंगा अंतर्धान पावल्यानंतर सुमारे १६० दिवसानंतर ती गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुन्हा अवतीर्ण झाली. गंगेच्या पुजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी तेथे गेले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर काळे यांनी गंगापुत्रांसहित इतरत्र याची माहिती दिली.गंगा आल्याचे वृत्त क्षेत्राच्या आजूबाजुला पसरताच अनेकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. त्यावेळी मुख्य असलेल्या काशिकुंडासहित अन्य कुंडे तुडुंब पाण्याने भरली होती तर काशिकुंडाच्याच बाजूला असलेल्या गोमुखातुन पाणी वाहत होते. गंगेचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर भाविकांची गंगाक्षेत्रावर रिघ सुरु होती. 

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी