शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

By admin | Updated: August 10, 2015 00:35 IST

जैतापूर अणुऊर्जा : बागायतींचा मोबदला अन्यथा जमिनी परत द्या

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांना तसे निवेदन सादर केले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या आंबा बागायती कायमस्वरूपी संपादित करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाधिकारी शेतकऱ्यांना संपादित जागेमध्ये जाण्यास मज्जाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बागायती, जमिनी बळकावून मोबदला न देता त्यांच्याकडून उत्पन्न हिरावून घेण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे निश्चित केले आहे.शेतकऱ्यांकडून लेखी निवेदने, पाठपुरावा करूनसुध्दा दखल घेण्यात येत नाही. गतवर्षी १५ आॅगस्ट २०१४ रोजी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी व प्रातांधिकाऱ्यांनी नंदकुमार राऊत यांना ११ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र पाठवून उपोषणास बसू नका, आपल प्रस्ताव महिनाभरात पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनसुध्दा त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. २६ जानेवारी २०१५ला पुन्हा शेतकरी उपोषणाला बसले असता त्यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून आंबा बागायत अहवालाची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी व बागायतदारांशी चर्चा करून संबंधित त्रुटीची पूर्तता करण्यात येईल, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव एनपीसीआयएल यांच्याकडे मागणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा आजपर्यंत खुलासा झालेला नाही. एनपीसीआयएल किंवा प्रशासन बागायतींचा मोबादला देण्यास तर तयार नसेल तर जमिनी शेतकऱ्यांना परत करा अथवा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)