शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

चिपळुणात कचरा प्रकल्प फुकटात, मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 2:33 PM

याआधीचा नगर परिषदेचा कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेला कचरा प्रकल्प बंद आहे. मात्र, आता नगर परिषदेने एकही रुपया खर्च न करता मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला.

ठळक मुद्देचिपळुणात कचरा प्रकल्प फुकटात, मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीचा पुढाकार सहा एकर जागेत प्रकल्प उभारण्याची तयारी

चिपळूण : याआधीचा नगर परिषदेचा कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेला कचरा प्रकल्प बंद आहे. मात्र, आता नगर परिषदेने एकही रुपया खर्च न करता मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला.नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत क्लीन ऊर्जा कंपनीने शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या सहा एकर जागेत आपला प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली. या प्रकल्पातून ओला, सुका व प्लास्टिक कचऱ्याचीही पूर्णपणे विल्हेवाट लावता येते. त्यातून कचऱ्याचे कोणतेही अंश शिल्लक राहात नाहीत किंवा त्यापासून प्रदूषण होत नाही, असा दावा कंपनीचे अभियंता उमेश खरे व ओमकार महाजन यांनी केला.

ते म्हणाले की, या कंपनीचे झाशी, ठाणे, उरण व अन्य काही ठिकाणी प्रकल्प असून, ठाण्यातील प्रकल्प हा एका हॉस्पिटलच्या आवारातच सुरू आहे. या प्रकल्पासाठी जागा, पाणी व वीज पुरवणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त नगर परिषदेला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही.

वीजबिल व पाणीपट्टी भरण्याची जबाबदारीदेखील कंपनीच घेणार आहे. त्यासाठी किमान १० वर्षांच्या कालावधीचा करार करावा लागणार आहे. मान्यता दिल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात हा प्रकल्प उभा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावर नगरसेवक कबीर काद्री, सुधीर शिंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मात्र, शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांचा समाचार घेत नकाघंटा वाजवून नका, अशा शब्दात सुनावले. प्रकल्प चांगला असेल तर तो स्वीकारण्यात यावा, असे स्पष्ट केले. त्यावर नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातू, नगरसेविका सीमा रानडे यांनी संकल्पना पटवून देण्याची मागणी केली. या प्रकल्पाची जबाबदारी संबंधित कंपनीने घेतली असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.नगर परिषदेचीच मालकीकचरा प्रकल्पाची जागा हस्तांतरीत करणार नसून, ती नगर परिषदेच्याच मालकीची राहणार आहे. केवळ करार करून जागा वापरण्यास दिली जाणार असून, त्यानंतरचा संपूर्ण खर्च कंपनीच करणार आहे. त्यासाठी नगर परिषदेला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी दिली.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न