शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीकडून फसवणूक

By admin | Updated: January 16, 2016 23:46 IST

अजित यशवंतराव : ग्रामस्थांची फसगत झाल्याचा आरोप

राजापूर : राजापूर तालुका व परिसरातील बेरोजगार तरूणांना नोकरीची अमिषे दाखवून व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, वेत्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनी बळकावू पाहणाऱ्या कोलकाता येथील आयलॉग पोर्टचा बंदर प्रकल्प कंपनीकडून केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाचीही फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी केला आहे. या परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांची व शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावात वस्तुस्थितीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनी विरोधात आता कायदेशीर कारवाईच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही अजित यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रकही त्यांनी दिले आहे. राजापूर तालुक्यात यापूर्वी राजापूर शिपयार्ड या कंपनीकडून वाडा, वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे. या शेतकऱ्यांनी सध्या या कंपनीविरोधात लढा पुकारला आहे. ही फसवणूक ताजी असतानाच आता कोलकातातील आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनीकडूनही अशाप्रकारे नाटे आंबोळगड किनाऱ्यावर वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. या विरोधात आता या परिसरातील शेतकऱ्यांनीही संघटीतपणे लढा देण्याचा निर्धार केला आहे. याला राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जर अशाप्रकारे कोणतीही कंपनी तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणार असेल तर आम्ही ते कदापीही सहन करणार नाही, असे स्पष्ट करत ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. या कंपनीकडून शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाची देखील फसवणूक करण्यात आल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी) खोटी माहिती? : कंपनीचा अहवाल चुकीचा? या प्रकल्पस्थळापासून जवळपास २.५० कि. मी. क्षेत्रामध्ये मनुष्यवस्ती आणि घरे नाहीत असे अहवालात नमुद करण्यात आले असले तरी प्रकल्पक्षेत्राच्या जवळच १ ते १.५० कि. मी. परिसरात आंबोळगड हे गाव वसलेले आहे. दोन कि. मी. अंतरावर तिवरे तर पुढे वेत्ये ही गावे आहेत. शासनाकडून व पर्यावरण मंडळाकडून परवाना मिळवण्यासाठी कंपनीकडून खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच जैविक पर्यावरण अहवालामध्ये तर अभ्यास क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरात जंगले नाहीत असे नमुद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या परिसरात नाटे, पडवणे व वेत्ये गावातील अनेक शेतकऱ्यांच्या कलमाच्या बागा असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. गुन्हा दाखल करा कंपनी चुकीचा अहवाल तयार करून फसवणूक करत आहे. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले.