शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार ग्रामसेवक निलंबित

By admin | Updated: June 25, 2014 00:49 IST

जिल्हा परिषदेची कारवाई : कामातील हलगर्जीपणा नडला, अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

रत्नागिरी : जन्म-मृत्यू व नमुना ८च्या संगणकीय नोंदणी प्रमाणित करावयाच्या कामात पूर्णत: हलगर्जीपणा केलेल्या चार ग्रामसेवकांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. काळम यांनी पत्रकार परिषदेत दिली. शून्य काम करणारे जे ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दिसले नाहीत, त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे काळम यांनी स्पष्ट केले. ज्या चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, त्यांत जी. बी. भोसले (शिंगारपूर/निवळी, ता. संगमेश्वर), सचिन पांडुरंग राठोड (नांदगाव, चिपळूण), महेश अनंत नक्षे (नांदगाव, खेड) व ए. डी. शिंदे (हातिप, ता. दापोली) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात या कामात आणखीही अनेक ग्रामसेवकांनी अत्यंत अल्प काम केल्याचे पुढे आले आहे. त्यांनाही समज देण्यात आली आहे. (पान ५ वर)गेल्या दोन महिन्यांत काहीही तांत्रिक अडचण नसताना हे काम पूर्ण झाले नसल्यानेच ही कारवाई करण्यात आली. काही ग्रामसेवकांनी जन्म-मृत्यू व नमुना ८ या संग्राम सॉफ्टमधील नोंदणी प्रमाणित करण्याच्या कामात अत्यंत चांगले व अभिनंदनीय काम केले आहे. त्यांत श्रीमती राखी भगवान भाटकर (साडवली, ता. संगमेश्वर), चंद्रमुनी शामराव शिंदे (कोसुुंब, ता. संगमेश्वर), हेमंत सखाराम पवार (अडरे, चिपळूण), जगन्नाथ वासुदेव झोपडे (हर्णै, ता. दापोली) व गौतम दामू केदार (लोटे, ता. खेड) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)कोणालाही माफी नाहीया कामात ज्यांनी-ज्यांनी हलगर्जीपणा केला आहे, त्यांनी हे काम तातडीने पूर्ण न केल्यास त्यांना माफी नाही. हलगर्जीपणा करणाऱ्यास सोडणार नाही, असा इशाराच काळम यांनी दिला. अन् रातोरात काम फत्ते!ज्या चार ग्रामसेवकांना निलंबित केले आहे, त्यांतील दोघांनी काल, सोमवारी रातोरात जन्म-मृत्यू व नमुना ८ची नोंदणी काम पूर्ण करून ते आज, मंगळवारी दाखवायला आणले. त्यामुळे त्यांच्या निलंबनावर परिणाम होणार नाही; परंतु जे काम दोन महिन्यांत जमले नाही, ते रातोरात होऊ शकते, ही बाबही पुढे आल्याचे काळम म्हणाले.