खांब चोरीप्रकरणी चार जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:05+5:302021-07-02T04:22:05+5:30

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील येथे इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले ८ लाख ५४ हजार रुपये किमतीच्या १५५ खांबांच्या ...

Four arrested in pillar theft case | खांब चोरीप्रकरणी चार जणांना अटक

खांब चोरीप्रकरणी चार जणांना अटक

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील येथे इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले ८ लाख ५४ हजार रुपये किमतीच्या १५५ खांबांच्या चोरीप्रकरणी गुहागर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

तालुक्यातील रानवी येथील हिंदुस्तान रिसॉर्ट येथून महिनाभरापूर्वी इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी १५५ खांब आणून ठेवण्यात आले होते. सुमारे ८ लाख ५४ हजार रुपये किमतीचे हे खांब चोरीला गेले होते. या घटनेचा तपास करताना गुहागर पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना चोरी करण्यासाठी आले असता संगमेश्वर तालुक्यातील एका ठिकाणी पकडले.

पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम व राजू कांबळे, वैभव चौगुले, विद्याधर नारकर, स्वप्निल शिवलकर, शैलेश वाणगे, प्रतीक रहाटे, सचिन पाटील, वैभव ओहोळ, विजय चव्हाण या पोलीस पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Four arrested in pillar theft case