शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

पशुबळीप्रकरणी भंडारपुळेत चौघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 5:50 PM

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारपुळे गावातील नांदेश्वर येथे शनिवारी पशुबळीचा प्रकार उधळून लावण्यात आला. याप्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवीतील एकाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपशुबळीप्रकरणी भंडारपुळेत चौघे अटकेतनांदेश्वर येथे पशुबळीचा प्रकार उधळला

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारपुळे गावातील नांदेश्वर येथे शनिवारी पशुबळीचा प्रकार उधळून लावण्यात आला. याप्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवीतील एकाला अटक करण्यात आली आहे.

गोपीनाथ झेपले (देवरुख), संतोष पालये (धामापूर-देवरुख), विश्वनाथ धावडे (जाकादेवी), संजय किनरे (वजरे-देवरुख) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान नांदेश्वर या देवस्थानाजवळ पीकअप गाडीमधून एक रेडा घेऊन आले होते. मात्र, याचवेळी भंडारपुळे येथील दिवाकर पाटील हे आपली जनावरे आणण्यासाठी गेले असता, त्यांनी हा प्रकार पाहिला. काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलीसपाटील विश्वनाथ पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली.भंडारपुळे-गणपतीपुळे गावचे पोलीसपाटील विश्वनाथ पाटील यांना याबाबत खबर मिळताच त्यांनी लागलीच गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या स्मिता पाटील यांच्याशी संपर्क साधला व या प्रकाराची सर्व माहिती दिली. विश्वनाथ पाटील यांच्याकडून माहिती मिळताच स्मिता पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश गावीत, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर सलगार, प्रशांत गोवळकर हे घटनास्थळी दाखल झाले.पशुबळीची वार्ता हा-हा म्हणता सर्वत्र पसरली आणि नांदेश्वर देवस्थानपासून ते अगदी पोलीस स्थानकापर्यंत ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याप्रकरणी प्राण्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी जयगड पोलीस ठाणे यांच्याकडे गु. र. नं. ३४/२०१९ व १९६० चे कलम ११ (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व मो. पा. का. कलम ३०/१७७/सी ३/१७७ भा. दं. वि. स. कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी