शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महायुतीला धक्का; भाजपचे माजी आमदार बाळ माने उद्धवसेनेत

By मनोज मुळ्ये | Updated: October 23, 2024 17:17 IST

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. रत्नागिरीच्या उमेदवारीसाठी ...

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. रत्नागिरीच्या उमेदवारीसाठी ते अधिक उत्सुक होते. मात्र रत्नागिरीत उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित असल्याने बाळ माने यांनी उद्धवसेनेत प्रवेश करण्याची तयारी केली होती. त्यानुसार बुधवारी ते उद्धवसेनेत दाखल झाले.अनेक वर्षे भाजपमध्ये काम करणा-या बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने एकमेकांसमोर निवडणुकीला उभे होते. त्यात बाळ माने यांचा पराभव झाला. त्यानंतर ते बराच काळ मुख्य प्रवाहातून बाजूला पडले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकांआधी ते पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी भाजपचा प्रचार सुरू केला. लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते उत्सुक होते. तेथे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. मात्र येथील आमदार महायुतीचाच असल्याने ही जागा शिंदे सेनेला म्हणजेच उदय सामंत यांना जाणार हे निश्चित होते. त्यामुळे बाळ माने यांनी उद्धव सेना किंवा अपक्ष असे मार्ग हाताळण्याचा निर्णय घेतला.उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे साडू असलेले बाळ माने पितृपक्षात उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत रत्नागिरीतील पदाधिका-यांनी माने यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे अलिकडेच पुन्हा एकदा सर्व स्थानिक पदाधिका-यांची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यात उमेदवारीबाबत त्यांची समजूत काढण्यात आली.बुधवारी माने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव सेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार विनायक राऊत, माधवी माने, भास्कर जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव, बाळ माने यांचे सुपुत्र विराज आणि मिहीर माने उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे