शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अन्न प्रक्रिया उद्याेग याेजना देणार फळप्रक्रिया उद्याेगांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी कृषी समूह गटांसाठी फळप्रक्रिया उद्योग ...

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी कृषी समूह गटांसाठी फळप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सहकार्य केले जाणार आहे.

केंद्राची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२१-२२ ते २०२४-२५ अखेर पाच वर्षे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबवली जाणार आहे. वैयक्तिक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपनी यांना याचा लाभ घेता येणार आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी, उद्योगस्तरवृध्दी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. नवीन उद्योग असल्यास आंबा प्रक्रियेसाठी तर जुना उद्योग असल्यास आंबा, काजू, फणस, कोकम, खाद्यपदार्थ, पिठे, मसाले उद्योग, मांस प्रक्रिया, दूध प्रक्रिया यासाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासिंग प्रमाणपत्र, राहत्या घराचे वीजबिल, बँक पासबुक मागील सहा महिन्यांची छायाप्रत, उद्योग ज्या जागेत करणार त्याचा घरपत्रक उतारा, भाडे करारपत्र, मशिनरी कोटेशन्स, नवीन बांधकाम करणार असल्यास ७/१२, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक या कागदपत्रांद्वारे या योजनेत सहभागी होता येणार आहे.

बचत गटांसाठी बचतगट स्थापनेवेळचा ठराव, बँक पासबुक छायाप्रत, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, कोटेशन, जागेचा भाडेकरार, उद्योग ज्या जागेत करणार त्याचा घरपत्रक उतारा, मशिनरी कोटेशन्स, कर्ज काढण्यासाठीचा गटाचा ठराव ही कागदपत्रे दिल्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. वैयक्तिक लाभासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावेत. शेतकरी कंपनी, बचत गटांनी तालुका कृषी अधिकारी किंवा व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

------------------------

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ धोरणानुसार जिल्हास्तरावर वैयक्तिक उद्योजक आणि विविध गटांचे सदस्य, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, संस्था आणि सहकारी उत्पादकांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी