जिल्ह्यात कोरोनाने पाच रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:46+5:302021-09-26T04:34:46+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील काेराेना रुग्णांमध्ये घट हाेत असतानाच कोरोनाबाधितांच्या मृत्युमध्ये मात्र वाढ होत आहे. जिल्हा आराेग्य विभागाकडून आलेल्या ...

Five patients died of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाने पाच रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने पाच रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यातील काेराेना रुग्णांमध्ये घट हाेत असतानाच कोरोनाबाधितांच्या मृत्युमध्ये मात्र वाढ होत आहे. जिल्हा आराेग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार गेल्या २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवे बाधित ८२ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात ५१ रुग्ण बरे झाले असून ७२७ रुग्ण उपचार घेत आहेत.

दिवसभरात आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील २ रुग्ण, दापोलीतील ७, खेडमधील १८, गुहागरातील ११, चिपळुणातील १५, संगमेश्वरातील ३, रत्नागिरीतील १५, लांजातील ६ आणि राजापूरमधील ५ रुग्णांचा समावेश आहे. एकूण ७७,६८२ बाधित रुग्ण आहेत. त्यात ॲंटिजन चाचणीतील ४५ तर आरटीपीसीआर चाचणीतील ३७ रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ७४,५४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.

जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यातील २ रुग्णांचा तर गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण २,४१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ३.१० टक्के आहे.

Web Title: Five patients died of corona in the district