शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खेर्डीत लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

चिपळूण : तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी येथे लसीकरणाचे केंद्र नव्हते. परिणामी खेर्डी ग्रामपंचायतीसह पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकमांच्या माध्यमातून ...

चिपळूण : तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी येथे लसीकरणाचे केंद्र नव्हते. परिणामी खेर्डी ग्रामपंचायतीसह पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकमांच्या माध्यमातून लसीकरण केंद्रासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार खेर्डीत सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरू झाले. पहिल्यादिवशी ४५ वर्षांवरील ८० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा निर्माण करण्यात आली होती. खेर्डीची लोकसंख्या तालुक्यात सर्वाधिक आहे. मात्र, येथे लसीकरण केंद्र नसल्याने अडरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खेर्डीवासीयांना जावे लागत होते. गर्दीमुळे अनेकांना परत यावे लागत हाेते़. पुन्हा दुसऱ्यादिवशी अडरेत जायला लागते. ग्रामस्थांचे हाेणारे हाल लक्षात घेऊन खेर्डी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे व आमदार शेखर निकम यांच्याकडे खेर्डीत लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनीही आमदार शेखर निकमांना साकडे घालून लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांनीही खासदारांच्या माध्यमातून लसीकरणासाठी पाठपुरावा केला होता.

लसीकरण केंद्र सुरू हाेण्यासाठी सर्वांकडूनच जोर लागल्याने जिल्हा परिषदेने सोमवारपासून खेर्डी ग्रामपंचायत इमारतीत लसीकरण केंद्र सुरू केले. दरम्यान, लसीकरणात वाढत्या गर्दीमुळे गोंधळ होऊ नये म्हणून टोकन पद्धत सुरू केली. यावेळी अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मयेकर, सरपंच वृंदा दाते, उपसरपंच वियय शिर्के, सदस्य विनोद भुरण, अभिजित खताते, सुप्रिया उतेकर, अपर्णा दाते, सचिन मोहिते, राकेश दाभोळकर, प्रकाश पाथरूड, आरोग्य सहायक लंबे, आरोग्य सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

---------------------

चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे साेमवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय दूर झाली आहे़.