कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:44+5:302021-09-26T04:34:44+5:30

२. चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द ग्रामपंचायत येथे बुधवारी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. दिवसभर गावातील ४५० ग्रामस्थांनी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन ...

Fight the Corona | कोरोनाशी लढा

कोरोनाशी लढा

२. चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द ग्रामपंचायत येथे बुधवारी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. दिवसभर गावातील ४५० ग्रामस्थांनी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचे डोस घेतले. दादर आरोग्य केंद्राच्या डॉ. भिसे, आरोग्यसेवक उज्ज्वल पांडे, अशोक शिंदे, अभिजित यादव, प्रज्ञा यादव, रविना सुतार, आशासेविका किरण कुंभार, नीता पेवेकर, रिया बामणे यांचे या लसीकरण मोहिमेसाठी विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

३. खेड तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असून, दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६,३२२ वर पोहोचली असली तरी सद्य:स्थितीत नगर परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये अवघे दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण सद्य:स्थितीत उपचारासाठी दाखल नाही. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने कन्टेन्मेंट झोनही कमी होऊ लागले आहेत.

Web Title: Fight the Corona