शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जिल्ह्यातून डेंग्यूचे भय लवकरच संपणार, संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 2:33 PM

dengue, health, ratnagirinews राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबरच डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे केवळ २१ रुग्ण आढळले असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता डेंग्यूची भीती राहिलेली नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातून डेंग्यूचे भय लवकरच संपणार, संख्येत घटजिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबरच डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे केवळ २१ रुग्ण आढळले असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता डेंग्यूची भीती राहिलेली नाही.जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंग्यूची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून डेंग्यूच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.जिल्ह्यात सन २०१९मध्ये डेंग्यूचे २२९ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर चालू वर्षात जानेवारी २०२०पासून आतापर्यंत जिल्ह्यात ८० संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी २१ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

यामध्ये दापोलीमध्ये ८ रुग्ण, संगमेश्वरात २, रत्नागिरीत ७, लांजात १ आणि राजापुरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये स्थानिक १२ रुग्ण आणि स्थलांतरित ९ रुग्ण आहेत. यावर्षीही डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण शून्य आहे.डेंग्यू हा एडीस् इजिटी या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याचाही खूप उपयोग होत आहे.डेंग्यूची लक्षणेअचानक जोराचा ताप येणे, डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे, त्वचेवर व्रण उठणे.खासगी रूग्णालयांतून डेंग्यू रूग्णांची माहिती मिळते का?जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच डेंग्यूच्या रुग्णांबाबत खासगी रुग्णालयांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास या रुग्णालयाकडून तत्काळ आरोग्य विभागाला रुग्णाबद्दलची माहिती कळविण्यात येते.

जिल्ह्यात इकोफ्रेन्डली डास निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळला जातो. त्याचबरोबर कंटेनर सर्वेक्षण करुन पॉझिटिव्ह आढळून आल्यास तेथे कीटकनाशकाची फवारणी केली जाते.- डॉ. संतोष यादव , जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी