शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण गटविकास अधिकाऱ्यांकडे कैफियत

By admin | Updated: September 22, 2015 23:53 IST

कौंढरताम्हाणेतील घरकुलाचा प्रश्न : काँग्रेस ग्रामसेविकेविरोधात आक्रमक

चिपळूण : तालुक्यातील कौंढरताम्हाणे या विकासाभिमुख गावातील ग्रामसेविकेमुळे विकासाला खीळ बसली आहे. या ग्रामसेविकेची तत्काळ उचलबांगडी करावी अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे मारु व आंदोलन करू, असा इशारा सरपंच चंदन भोबस्कर व काँग्रेसचे प्रवक्ते प्रभाकर जाधव यांनी दिला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत व इतर पदाधिकाऱ्यांनी घरकुलाचा विषय लावून धरला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली आज (मंगळवारी) दुपारी गटविकास अधिकारी शुभांगी पाटील यांना शिष्टमंडळ भेटले. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर कौंढरताम्हाणे येथील ग्रामसेविकेच्या कारभाराचा पाढा वाचला. ग्रामसेविका विकास कामात सहकार्य करीत नसल्याने गावचा विकास खुंटला आहे, अशी कैफियत सरपंच भोबस्कर यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या ग्रामसेविकेविरोधात गावातील ग्रामस्थांच्याही तक्रारी आहेत. त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने पेच निर्माण होत असल्याचे भोबस्कर यांनी सांगितले.याबाबत गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करुनही प्रशासन ढिम्म आहे. विस्तार अधिकारी ग्रामसेवकांना पाठिशी घालत आहेत, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला. गटविकास अधिकारी पाटील यांनी याप्रकरणी आपण गांभिर्याने दखल घेऊ, विस्तार अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा आम्ही घेत आहोत. त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तर ग्रामसेविकेबाबत १ आॅक्टोबरपर्यंत योग्य निर्णय होईल, असे त्यांनी सुचित केले. शासनाच्या इंदिरा आवास घरकुल योजनेबाबत नवीन धोरणाचा फटका अनेक मोठ्या गावांना बसत आहे. इंदिरा आवासच्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थींनी आपली गरज भागवण्यासाठी कर्ज काढून घरकुल बांधले आहेत, असे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.ज्यांचे काम पूर्ण आहे, अशा लाभार्थींची खातरजमा करुन त्यांना तत्काळ निधी उपलब्ध करुन द्या. शिवाय प्रतीक्षा यादीवरील लाभार्थींना जास्तीत जास्त संधी द्यावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. यावर विचार न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे गटविकास अधिकारी पाटील यांनी सांगितले. प्रशासकीय बाबींचा अभ्यास करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार लाभार्थींना लाभ देता येईल का, हे पाहिले जाईल. त्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी येथील गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकुमार थरवळ, सुधीर दाभोळकर, पवार, राजा यादव, प्रभाकर जाधव, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष गुलजार कुरवले, सरपंच चंदन भोबस्कर, प्रफुल्ल पिसे व कौंढर ताम्हाणेचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)