शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण मंत्री नव्हेत; ते तर पऱ्यावरचे मंत्री

By admin | Updated: October 30, 2015 23:40 IST

भास्कर जाधव : रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल--रणसंग्राम

मंडणगड : हे पर्यावरण मंत्री नव्हेत ते पऱ्यावरचे मंत्री आहेत. रामदास कदम म्हणजे नमनातला बुवा असल्याचा घणाघाती हल्लाबोल आमदार भास्कर जाधव यांनी मंडणगड येथे महाआघाडीच्या प्रचारसभेत केला.़ यावेळी त्यांनी पंचवीस वर्षे तालुक्यात सत्ता असतानाही शहराला विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे पाप शिवसेनेच्या नेत्यांनी करुन मंडणगड शहरातील जनतेची घोर फसवूणक केली आहे़ त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत येथील मतदार सेनेला धूळ चारतील, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मंडणगड शहरातील जनता विकासासाठी आसुसलेली आहे. जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे.़ शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे़ शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, अंतर्गत सुविधा यापासून सत्ता असूनही शिवसेनेने वंचित ठेवले आहे. जनतेच्या समस्या न सोडवता केवळ भावनिक आणि विद्वेषाचे राजकारण करून निवडणुका जिंकणे हेच शिवसेनेचे काम आहे़ शिवसेनेच्या नेत्यांना जनतेच्या विकासाचे प्रचंड वावडे आहे. त्यांच्या बेपर्वाईमुळेच मंडणगडमधील जनता विकासापासून शेकडो मैल दूर आहे. जाती-धर्माचे राजकारण करून दलित, मुस्लीम, महिलांचा अपमान करून जनतेला समस्यांच्या विळख्यात अडकवून ठेवणाऱ्या शिवसेनेला मंडणगड शहरातील विकासासाठी आसुसलेल्या जनतेने जागा दाखवावी, असे आवाहन केले़ मंडणगड येथे राष्ट्रवादी-काँग्रेस आणि रिपाइं महाआघाडीच्या मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत बोलताना आमदार जाधव यांनी विकासाची नेमकी संकल्पना काय आणि भावनिक राजकारणामुळे जनतेचे होणारे नुकसान या गोष्टींना हात घालत जणू मंडणगडवासियांशी संवादच साधला. आमदार भास्कर जाधव यांच्या सभेला मंडणगड शहरातील नागरिकांनी केलेली गर्दी सभा जिंकून गेली़आज ग्रामीण भागाचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे तालुक्यांच्या ठिकाणी नगरपंचायती करण्याचा निर्णय आमच्या आघाडी सरकारने केला. यामागे या शहरांचा विकास करून जनतेला मुलभूत सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही हे करू ते करू म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी यापूर्वी काय केले? या मतदार संघाचे आमदार संजय कदम हे एकाचवेळी सुमारे दहा कोटींचा निधी आणू शकतील, त्यांच्यात तुमचा आणि शहराचा विकास करून तुमच्या मुलभूत समस्या सोडवण्याचा प्रचंड आत्मविश्वास आहे. याच आत्मविश्वासाला आणि शहराच्या विकासाला मतदान करून विकासाची कास धरण्याची गरज आहे़ मंडणगड शहरातील जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीची निर्मिती झाली आहे. शहरातील जनतेला शिक्षण, आरोग्य, पाणी, शौचालये, मुताऱ्या, गटारे आदी विविध सुविधा तसेच पर्यटनदृष्ट्या शहराचा विकास करणे, शहराचा विकासात्मक नवा आराखडा तयार करून मंडणगड शहराची बकाल अवस्था घालवून शहर स्मार्ट बनवण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे मंडणगड शहरातील समस्या सोडवण्याची क्षमता महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यांच्या पाठीशी आमदार संजय कदम ठामपणे उभे आहेत. त्यामुळे जनतेला विकास पाहिजे की, भूलथापा याचा विचार मंडणगडमधील सुज्ञ जनता नक्की करेल़आमदार संजय कदम यांनी सांगितले की, शिवसेनेच्या मंत्र्यांना जनताच नाकारत आहे. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने सेनेचे नेते बिथरलेले आहेत. आम्हाला मंडणगड शहराचा विकास महत्वाचा आहे. एकवेळ सत्ता द्या, मंडणगड शहर राज्यातील एका आदर्श शहर म्हणून अल्पावधीतच नावारूपाला येईल, असा आशावाद आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, खेडचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम, सुनील चव्हाण, रिपाइंचे कोकण प्रदेशाध्यक्ष सिद्घार्थ कासारे, ज्येष्ठ नेते दादा मर्चंडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष भरत यादव, काँग्रेसचे सरचिटणीस संतोष मांढरे, युवानेते संदेश चिले, शहराध्यक्ष वैभव कोकाटे, अनिल घरटकर, सुनील घरटकर, गणेश जोगी, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, ज्येष्ठ नेते दौलतराव पोष्टूरे, विजय डोईफोडे, विजय पोटफोडे, अरुण घोसाळकर, चेतन सातोपे, महेश कासारे, अनिल रहाटे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)खडा सवाल : जनतेने शिवसेनेला का नाकारले?मंडणगड हे एतिहासिक शहर आहे़ मात्र, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि दोनवेळा मंत्रीपदाची शाल घेऊन मिरवणारे रामदास कदम यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळात मंडणगड शहराच्या विकासासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करून जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या विकासासाठी मी मंत्री तसेच आमदार असताना कोट्यवधींचा निधी दिला आहे. नगरपंचायतीवर सत्ता कोणाची आहे याचा मी कधीच विचार केला नाही़ मात्र, आज जिल्ह्यातील सातही नगरपंचायतींमध्ये जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. याचे कारण काय ?नेत्यांवर आगपाखडमंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड केली. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले.