लिफ्ट घेणे झाले जीवघेणे; रत्नागिरीत प्रौढाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:11 IST2025-11-13T13:11:12+5:302025-11-13T13:11:27+5:30
रत्नागिरी : दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका प्रौढासाठी जीवघेणे ठरल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ते खरवते मार्गावर घडली. मंगळवारी, (दि.११) ...

लिफ्ट घेणे झाले जीवघेणे; रत्नागिरीत प्रौढाचा अपघातात मृत्यू
रत्नागिरी : दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका प्रौढासाठी जीवघेणे ठरल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ते खरवते मार्गावर घडली. मंगळवारी, (दि.११) सकाळी दुचाकी अपघात होऊन मागे बसलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. संजय सखाराम सनगरे (वय ५०, रा.कोतवडे सनगरेवाडी, ता.रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी कोतवडे वारेकरवाडी येथे राहणाऱ्या सूर्यकांत जयदेव वारेकर (वय ५७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते या अपघातात जखमी झाले आहेत.
सूर्यकांत वारेकर कोतवडे येथून दुचाकीने खोपर्डे गावाकडे जात होते. वाटेत संजय सनगरे यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर, थोड्या अंतरावर गेल्यानंतर खरवते येथील उताराच्या आणि वळणाच्या रस्त्यावर दुचाकी घसरली व दोघेही खाली पडले. या अपघातात संजय सनगरे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चालक सूर्यकांत वारेकर हेही या अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या अपघाताबाबत सूर्यकांत वारेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.