पावस परिसरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 17:40 IST2020-04-07T17:32:52+5:302020-04-07T17:40:12+5:30

उपासमारीने पावस खांबड फाटा मावळंगे रोड येथे साखरकर यांच्या आंबा बागेमध्ये मृत अवस्थेत पडलेला बिबट्या सापडला.

Dying of starvation in rain area | पावस परिसरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

पावस परिसरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

ठळक मुद्दे बिबट्याचा भूकबळीने मृत्यूपावस परिसरातील घटना

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस खांबड फाटा मावळंगे रोड येथे मंगेश चावडकर यांच्या आंबा बागेमध्ये दोन ते तीन वर्षांच्या नर जातीच्या बिबट्याचा भूकबळीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या बागेत राखणीसाठी असलेल्या गुरख्याला बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने ही घटना आपल्या मालकाला सांगितली. असिफ सावकार यांनी या घटनेची माहिती पोलिसांना व वनविभागाला दिली.

वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या बिबट्याचा भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज वन अधिकारी प्रियांका लगड यांनी व्यक्त केला.

यावेळी वन विभागाचे कर्मचारी, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित, महेश गुरव, किशोर धातकर उपस्थित होते.

 

Web Title: Dying of starvation in rain area