शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेलाच

By admin | Updated: December 24, 2015 00:34 IST

मच्छिमारीवर गंभीर परिणाम : जोर कमी होण्याची प्रतीक्षा; खराब वातावरणामुळे नौका बंदरात उभ्या

देवगड : देवगड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, या वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. वाऱ्याचा जोर कमी झाल्यानंतरच समुद्रातील मच्छिमारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.उपरच्या वाऱ्यामुळे सध्या समुद्र खवळला आहे. या खराब वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकाही बंदरात परत येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झाल्यावर उपरचा वारा जोरात वाहू लागतो. मात्र, वातावरण निवळल्यावर मच्छिमारांना मासळी चांगल्या प्रमाणात मिळते, असा मच्छिमारांचा अनुभव आहे. नारळी पौर्णिमेनंतर काही नौकामालकांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्या. परंतु, वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे समुद्रातील वातावरणही बिघडले व पर्यायाने या वातावरणाचा परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला.मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या मोठ्या नौकाधारकांना कर्मचाऱ्यांचा पगार तसेच जेवणखाणे यांचा खर्च मोठा असल्याने व मासळीचे प्रमाण कमी झाल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. समुद्रातील वातावरणातही वारंवार होत असलेल्या बदलाचा मच्छिमारीवर परिणाम होत असून, या वातावरणामुळे नौका मच्छिमारीसाठी न पाठवता बंदरातच उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत.खाडीमध्येही पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा व्यवसायही संकटात आहे. खाडीत मिळणारे मुळे, तिसरे यांचे प्रमाणही कमी झाल्याने मच्छिमारीलाच पूरक असणारे हे छोटे व्यवसायही सध्या बंद आहेत. (प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झाल्यावर वारा जोरात.अचानक झालेल्या बदलामुळे वातावरणातही बदल.मच्छिमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी.छोटे व्यवसायही सध्या बंद आहेत.