शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये दारूचा महापूर

By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST

पोलिसांचीच कारवाई : उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

खेड : मुंबईच्या मालवणी भागात झालेल्या दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, खेड शहरातील मोक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात आजही गावठी दारूचे अड्डे तेजीत सुरू आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच हे धंंदे विनासायास सुरू असतात. मात्र, त्रासलेल्या महिलावर्गाने हे धंदे नेस्तनाबूत करण्याची मागणी केली आहे.मालवणी दारूकांडानंतर संबंध महाराष्ट्रात गावठी दारूच्या अड्ड्यांवर मोठे धाडसत्र सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडीत मोठमोठी घबाडदेखील सापडली आहेत. दारूच्या अड्ड्यांचे लोण मोठ्या शहरात आहे; असे नव्हे, तर खेड शहर आणि परिसरात गावठी दारूचे असे अनेक अड्डे आढळू आले आहेत. मुंबईतील या दारूकांडानंतर पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेडमधील दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या आहेत. मात्र, या धाडी मर्यादित आहेत. यातील पोलिसांनी टाकलेल्या धाडीचे प्रमाण उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीच्या प्रमाणापेक्षा मोठे आहे.तिसंगी, कुळवंडी, सुसेरी व खारी यांसारख्या ठिकाणी असणारे गावठी दारूचे अड्डे पोलिसांच्या कारवाईमुळे नेस्तनाबूत झाले आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी गावठी दारूचे अड्डे आपल्या अखत्यारीत वाचवले आहेत. मोठे अड्डे स्थानिक पातळीवर आजही सुरू असले तरी ते पोलिसांपासून काहीसे दूर आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारुधंद्यांकडे आता स्वत: लक्ष देणे आवश्यक असल्याचा सूर तालुक्यातून उमटत आहे. (प्रतिनिधी) अड्डे कमी : उत्पादन शुल्क खात्याचे सहकार्यही कमीपोलिसांच्या या धाडसत्रामुळे काही ठिकाणचे गाावठी दारूचे अड्डे नेस्तनाबूत झाले आहेत. मात्र, याकामी उत्पादन शुुल्क विभागाचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याबाबत काहीशी नाराजी आहे. काही गावठी हातभट्ट्यावगळता मोठमोठी दारू विक्री करणारी केंद्र ग्रामीण भागात सुरू होती. आता हे प्रमाण कमी झाले असले तरीही ते पूर्णत: कमी झालेले नाही. त्यामुळे खेड तालुक्यात अजूनही दारुभट्ट्या धगधगत आहेत. त्यावर अंकुश कधी ठेवणार? असा सवाल आता खेड तालुक्यातून केला जात आहे.मोर्चेही दिसेनासेखेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील मोठे दारूचे अड्डे नष्ट झाले आहेत. यामुळे पोलीस स्थानकात वारंवार महिलांचे दारू बंदीबाबतचे येणारे मोर्चेदेखील आता दिसेनासे झाले आहेत.